'बेस्ट' आयडिया !

  Mumbai
  'बेस्ट' आयडिया !
  मुंबई  -  

  अधिकाधिक मुंबईकरांना बेस्टकडे वळवण्यासाठी बेस्टनं नवा उपक्रम हाती घेतलाय. बेस्ट थेट भेट या उपक्रमाद्वारे बेस्ट आगाराचे व्यवस्थापक आणि अधिकारी थेट आगारात जाऊन प्रवाशांशी संवाद साधणार आहेत. त्यानुसार 11 सप्टेंबरला मुंबईत हा उपक्रम राबवण्यात येणार आहे. धारावी, काळाकिल्ला, कुर्ला, मरोळ, मजास, दिंडोशी आणि मागाठाणे या आगारांमध्ये बेस्ट थेट भेट उपक्रम पार पडणार आहे. यापूर्वी गेल्या रविवारी म्हणजेच 4 सप्टेंबरला बेस्ट थेट भेट उपक्रम राबवण्यात आला होता. या उपक्रमाला प्रवाशांनी चांगला प्रतिसाद दिला. प्रवाशांच्या सुचनांचा विचार करून त्या लवकर अमलात आणल्या जातील असं आश्वासन बेस्टनं दिलंय. 

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.