Advertisement

बेस्ट खरेदी करणार १ हजार नवीन बस, टॅक्सी-कॅबला देणार टक्कर

या नवीन बस बेस्टच्या ताफ्यातील जुन्या बसची जागा घेतील. एकेकाळी मुंबईच्या रस्त्यांवर केवळ बेस्टचं राज्य होतं. पण सद्यस्थितीत मुंबईतील रस्त्यांचा ताबा टॅक्सी-रिक्षा आणि ओला, उबर सारख्या खासगी अॅपबेस्ड कॅब्सनी घेतला आहे. यामुळे बेस्टला मोठ्या स्पर्धेला तोंड द्यावं लागत आहे.

बेस्ट खरेदी करणार १ हजार नवीन बस, टॅक्सी-कॅबला देणार टक्कर
SHARES

शहरातील टॅक्सी-रिक्षा आणि प्रामुख्याने खासगी कॅबच्या वाढलेल्या प्रभावाला टक्कर देण्यासाठी बेस्ट प्रशासन १ हजार नवीन बस खरेदी करण्याचा विचार करत आहे. या बसमध्ये मिडी आणि मिनी एसी बसचा समावेश असेल. यासंदर्भातील प्रस्ताव अर्थसंकल्पीय बैठकीत मांडण्यात आला आहे. या बसमुळे दोन बसमधील फ्रिक्वन्सी वाढण्यास मदत होणार आहे.

स्पर्धेला तोंड

या नवीन बस बेस्टच्या ताफ्यातील जुन्या बसची जागा घेतील. एकेकाळी मुंबईच्या रस्त्यांवर केवळ बेस्टचं राज्य होतं. पण सद्यस्थितीत मुंबईतील रस्त्यांचा ताबा टॅक्सी-रिक्षा आणि ओला, उबर सारख्या खासगी अॅपबेस्ड कॅब्सनी घेतला आहे. यामुळे बेस्टला मोठ्या स्पर्धेला तोंड द्यावं लागत आहे.

नवी रणनीती

बेस्टला आपली प्रवासी संख्या २९ लाखांवरून ४९ लाखांपर्यंत घेऊन जायची आहे. त्यामुळे बेस्ट प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी नवीन रणनीती आखत आहे. लहान आकाराच्या मिनी आणि मिडी एसी बस लहान रस्त्यांवर देखील धावू शकतील. रेल्वे स्थानक परिसर तसंच लहान मार्गांसाठी या बस उपयुक्त ठरू शकतील, असं प्रशासनाला वाटत आहे. याआधी दादर आणि चर्चगेट परिसरात अशा प्रकारच्या बस प्रवाशांसाठी फायद्याच्या ठरत आहेत.

त्यानुसार हा प्रस्ताव मंजूर झाल्यास १८ महिन्यांच्या आत बेस्टला नवीन बस मिळू शकतील. परंतु आर्थिक संकटात सापडलेल्या बेस्टला नवीन बस मिळू शकतील का? हाच मोठा प्रश्न आहे.हेही वाचा-

दिवाळी उलटली तरी बेस्ट कर्मचारी बोनसच्या प्रतिक्षेत

बेस्ट बसचे बनावट पास बनवणारी टोळी अटकेतRead this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा