अंधांसाठी 'बेस्ट' आयडिया


SHARE

मुंबई - केंद्र सरकारच्या निर्णयानुसार अंध आणि अपंगांना आता बेस्टच्या बसमधून मोफत प्रवास करता येणार आहे. अंध आणि अपंगांच्या मोफत प्रवासाच्या या योजनेच्या अंमलबजावणीसाठी बेस्टला मोठा आर्थिक ताण सहन करावा लागणार आहे. बेस्टचा हा तोटा भरून काढण्यासाठी महापालिका बेस्टला एक कोटीचे अनुदान देणार आहे. दिवाळीपूर्वीच या योजनेची अंमलबजावाणी करण्यात येईल. महापालिका दरवर्षी जेंडर बजेटमध्ये अंध आणि अपंगांच्या विकासासाठी तीन टक्के निधी राखून ठेवत असते. त्या निधीतूनच पालिका बेस्टला एक कोटीचा निधी देणार असल्याने अंध आणि अपंगांना बसच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत प्रवास मोफत करता येणार आहे. महापालिकेने बेस्ट उपक्रमाला १० लाख रुपये अनुदान दिले होते, मात्र बेस्टने या योजनेची अंमलबजावणी न केल्यामुळे अंध आणि अपंगांच्या योजनेसाठी ९० लाख रुपये अनुदान देण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे.

अडीच लाख लोकांना लाभ मिळणार

मुंबईत अडीच ते तीन टक्के म्हणजे अडीच लाख अंध आणि अपंग आहेत. अंध आणि अपंगांनी त्यांच्या अपंगत्वाचा दाखला दिल्यानंतर त्यांना झीरो पैशाचे विनामूल्य तिकीट देण्यात येईल.

संबंधित विषय
ताज्या बातम्या