Advertisement

वाढीव वीजबिलात २ टक्के सूट देण्याचा बेस्टचा निर्णय

मुंबईत कोरोनाच्या काळात अनेकांना वीज बील अव्वाच्या सव्वा आलं.

वाढीव वीजबिलात २ टक्के सूट देण्याचा बेस्टचा निर्णय
SHARES

मुंबईत कोरोनाच्या काळात अनेकांना वीज बील (electricity bill) अव्वाच्या सव्वा आलं. कोरोनामुळं आर्थिक अडचण असल्यानं बील भरायचं कसं असा प्रश्न बेस्टच्या (best) ग्राहकांना सतावत होता. परंतु, बेस्टनं आता ग्राहकांसाठी एक दिलासादायक निर्णय घेतला आहे. ग्राहकांना मदत करण्यासाठी तसेच वीज बिल भरण्यास प्रोत्साहित करण्यासाठी बेस्टनं ग्राहकांना बिलात २ टक्के सूट देण्याचा निर्णय घेतला आहे.

ज्या ग्राहकांना बील (bill) अधिक आली, त्या ग्राहकांना मदत करण्यासाठी, वीजबिल भरण्यास प्रोत्साहित करण्यासाठी आणि उर्वरित थकबाकी वसुलीसाठी बेस्टने वीज ग्राहकांना बिलात २ टक्क्यांची सूट देण्याचा निर्णय घेतला आहे.

ज्या वीजग्राहकाने नोव्हेंबर महिन्याचे वीजबिल तात्काळ भरले, त्याला एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबरमधील वीज वापरावरील प्रदान आकार आणि वीज बिलाच्या थकबाकीवरील व्याज माफ करण्यात येणार आहे. तर एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्याच्या वीज वापराच्या बिलात २ टक्के सूट देण्यात येणार आहे.

नोव्हेंबर महिन्यातील वीजबिल नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारीमध्ये भरल्यास त्या ग्राहकाला एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबरमधील वीज वापरावर विलंब शुल्क आणि व्याजात सूट दिली जाणार आहे. या ग्राहकाला एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात झालेल्या वीज वापराच्या बिलावर १ टक्के सूट दिली जाणार आहे.

बेस्टची सूट

  • या संबंधित महिन्यातील वीजबिलाचे तिन्ही हप्ते वेळेत भरले तर व्याजाबाबत सूट दिली जाईल. 
  • हा हप्ता भरल्यानंतर ग्राहक त्यावरील सूट मिळविण्यास पात्र राहील. 
  • ही सूट पुढील वीज बिलात समाविष्ट केली जाईल.
  • ज्यांनी वेळेत बिले भरली आहेत त्यांना २ टक्के सूट दिली जाईल.
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा