Advertisement

बेस्टची वीज स्वस्त होणार; तर महावितरणची कडाडणार ?

१ एप्रिलपासून बेस्टनं आपल्या वीजदरात कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यात वीज पुरवठा करणाऱ्या कंपन्या १ एप्रिलपासून वीजदरात बदल करण्याच्या तयारीत आहेत.

बेस्टची वीज स्वस्त होणार; तर महावितरणची कडाडणार ?
SHARES

१ एप्रिलपासून बेस्टनं आपल्या वीजदरात कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यात वीज पुरवठा करणाऱ्या कंपन्या १ एप्रिलपासून वीजदरात बदल करण्याच्या तयारीत आहेत. बेस्ट ईलेक्ट्रिसिटी आपल्या वीज दरात ३ टक्क्यांची कपात करणार आहे. तर दुसरीकडे महावितरणसारख्या कंपनीची वीज कडाडण्याची शक्यता आहे. ६ महिन्यांपूर्वी बेस्टनं वीजदरात कपात केली होती.


टाटा, अदानीची दरवाढ ?

एकीकडे बेस्टसारखी कंपनी वीज दरात ३ टक्क्यांची कपात करणार आहे. तर दुसरीकडे टाटा आणि अदानीसारख्या वीज पुरवठा करणाऱ्या कंपन्या वीज दरात अनुक्रमे २ आणि १ टक्क्यांची वाढ करण्याची शक्यता आहे. सध्या महावितरणकडे वाणिज्यिक, औद्योगिक ग्राहकांची संख्या सर्वाधिक आहे. तर ही कंपनी सध्या १८ ते १९ हजार मिलियन मेगावॅट वीजेची मागणी पूर्ण करत आहे. तर सध्या बेस्टकडे १०.५ लाख ग्राहक असून बेस्ट ८०० मेगावॅट वीज निर्मिती करत आहे.




महापालिकेच्या डोळ्यावर झापड कायम, मुंबईतील पुलांचं ऑडिट पुन्हा देसाईकडे

रेल्वे स्थानकावर लिंबू पाणी पिताय, तर आधी हे वाचा...




Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा