Advertisement

बेस्ट कामगारांना दिलासा, बोनसची रक्कम पगारातून कापणार नाही!


बेस्ट कामगारांना दिलासा, बोनसची रक्कम पगारातून कापणार नाही!
SHARES

बेस्ट कामगारांना दिवाळीनिमित्त देण्यात आलेल्या ५००० रुपयांच्या उचल रकमेची वसुली जानेवारीपासून दरमहा कर्मचाऱ्यांच्या पगारातून केली जाणार नाही. बेस्ट समिती सदस्य सुनील गणाचार्य यांनी बेस्ट समितीत पगारातून कापण्यात येणाऱ्या बोनसच्या रक्कमेबाबत प्रशासनाला धारेवर धरल्यानंतर अखेर बेस्टचे महाव्यवस्थापक सुरेंद्रकुमार बागडे यांनी ही रक्कम पगारातून कापून घेण्यात येणार नसल्याचे जाहीर केले.


'आधी एनओसी आणा'

बेस्ट समितीच्या बैठकीत भाजपाचे सदस्य सुनील गणाचार्य यांनी सभा तहकुबीच्या माध्यमातून कामगारांच्या पगारातून कापण्यात येणाऱ्या दरमहा ५०० रुपयांच्या रकमेबाबत प्रशासनाला जाब विचारला. बेस्ट आर्थिक तोट्यात असल्यामुळे उपक्रमाने ५५० कोटींच्या काटकसरीच्या प्रस्तावांना मंजुरी दिली आहे. तर १५० कोटींच्या शिफारशींचे प्रस्ताव कामगार संघटनांशी संबंधित आहेत. त्यामुळे त्यांची एनओसी आणावी, त्यानंतरच हा निर्णय घेता येईल.


'पैसे कापणं योग्य नाही'

सानुग्रह अनुदानाच्या या उचल रक्कमेसाठी एकूण २१ कोटी रुपये खर्च झाला आणि त्या तुलनेत ५५० कोटींच्या काटकसरीचे प्रस्ताव मंजूर करण्यात आले आहेत. तरीही कामगारांच्या पगारातून पैसे कापले जाणार असतील तर योग्य नाही, असं गणाचार्य यांनी सांगितलं.


१० तारखेच्या आत पगार कुठे?

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत सर्व कामगारांचे पगार १० तारखेच्या आत दिले जातील, असं सांगण्यात आले होते. पण १२ तारीख उलटली तरी कर्मचाऱ्यांना पगार मिळालेला नाही. वेळेवर पगार नाही आणि त्यातही तो कापून घेतला जात असेल, तर ते योग्य नसून ही रक्कम त्यांच्या पगारातून कापून घेऊ नये, याचं आश्वासन महाव्यवस्थापकांनी द्यावं, असंही त्यांनी सांगितलं.


निर्णय घेण्यास अडचण

यावर विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी यांनी कर्मचाऱ्यांना मदत करायला हवी, असं सांगितलं. कामगारांचे काही प्रश्न न्यायालयात आहे, त्याबाबत आपल्याला यावर निर्णय घेता येत नाही. मुंबई महापालिका बेस्टला काही मदत करत नाही. त्यामुळे अजूनही पगार देता आलेला नाही, असं सांगितले.


अखेर सभा तहकुबी मागे

यावर महाव्यवस्थापक सुरेंद्र बागडे यांनी, अजूनही कामगारांचा पगार दिलेला नाही. त्यामुळे प्रस्तावात सुधारणा करण्याच्या सूचना दिल्या आहेत. परंतु पुढील प्रस्ताव मंजूर होण्यासापेक्षा पगारातून ही रक्कम कापून घेतली जाणार नाही, असं सांगितलं. यावेळी बेस्ट समिती अध्यक्ष अनिल कोकीळ यांनी कामगारांच्या पगारातून पैसे कापून घेऊ नये यासाठी आपणही प्रयत्न केल्याचं सांगितले. महाव्यवस्थापकांकडून समाधारक उत्तर आल्यामुळे अखेर गणाचार्य यांनी ही सभातहकुबी मागे घेतली.हेही वाचा-

बेस्ट कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, बोनस कापणार नाही!

बेस्ट कामगारांना वेळेत पगार ‘इस्क्रो’ खात्यातील बदलामुळेच!संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा