Advertisement

भानुशाली इमारतीतील रहिवाशांना घराच्या चाव्या

फोर्ट येथील भानुशाली इमारत कोसळून त्यामधील काही जणांनी आपलं घर आणि आपला जीव गमावला. त्यामधील २१ कुटुंबांना ताडदेव चिखलवाडी इथं घराच्या चाव्या देण्याचा कार्यक्रम नुकताच पार पडला.

भानुशाली इमारतीतील रहिवाशांना घराच्या चाव्या
SHARES

फोर्ट येथील भानुशाली इमारत कोसळून त्यामधील काही जणांनी आपलं घर आणि आपला जीव गमावला. त्यामधील २१ कुटुंबांना ताडदेव चिखलवाडी इथं घराच्या चाव्या देण्याचा कार्यक्रम नुकताच पार पडला. या समारंभाला गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, खासदार अरविंद सावंत, आमदार विनोद घोसाळकर व स्थानिक नगरसेवक उपस्थित होते. (bhanushali building residence gets a new home in tardeo mumbai)

 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस परिसरातील टपाल मुख्यालयाजवळील ५ मजली ‘भानुशाली’ इमारतीचा काही भाग १६ जुलै रोजी लगतच्या लकी हाऊस, गणेश चाळीवर कोसळला होता. या इमारतीचा एका बाजूचा संपूर्ण भाग कोसळला, तर दुसऱ्या भागात रहिवासी अडकले होते. 

हेही वाचा - भानुशाली दुर्घटनाग्रस्त इमारतीमधील मृतांचा आकडा १० वर

दुर्घटनाग्रस्त इमारत उपकरप्राप्त इमारत होती. मोडकळीस आलेल्या या इमारतीच्या दुरुस्तीसाठी ‘म्हाडा’कडून ‘ना हरकत’ प्रमाणपत्र घेण्यात आलं होतं. पालिकेकडूनही आवश्यक ती परवानगी देण्यात आली होती. या इमारतीच्या दुरूस्तीचं काम टाळेबंदीमुळे अडकलं होतं. अनेक कुटुंब इमारत सोडून गेले होते. मात्र ८ कुटुंब इमारतीतच राहत होते. इमारतीचा एका बाजूचा भाग पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळला. स्थानिक रहिवाशांनी दुर्घटनास्थळी धाव घेतली आणि घटनेची अग्निशमन दलाला माहिती दिली.

या इमारत दुर्घटनेत ९ जणांचा मृत्यू झाला तर २५ हून अधिकजण जखमी झाले. इमारत कोसळल्यानंतर या इमारतीतल रहिवाशांचा वास्तव्याचा प्रश्न निर्माण झाला होता. त्यानुसार त्यांना घराच्या चाव्या सुपूर्द करण्यात आल्या आहेत.

हेही वाचा - मालवणीतील मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी ४ लाखांची मदत

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा