Advertisement

न्या. भूषण धर्माधिकारी बनले मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती

मुंबई उच्च न्यायालयाचे प्रभारी मुख्य न्यायमूर्ती भूषण धर्माधिकारी (justic Bhushan dharmadhikari) यांची मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तीपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

न्या. भूषण धर्माधिकारी बनले मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती
SHARES

मुंबई उच्च न्यायालयाचे प्रभारी मुख्य न्यायमूर्ती भूषण धर्माधिकारी (justic Bhushan dharmadhikari) यांची मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद (president ramnath kovind) यांच्या आदेशानुसार, केंद्रीय विधी आणि न्याय मंत्रालयानं बुधवारी त्यांच्या नियुक्तीसंदर्भात अधिसूचना प्रसिद्ध केली.

मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती प्रदीप नंदराजोग (chief justice pradeep nandrajog) २३ फेब्रुवारीला सेवानिवृत्त झाले होते. त्यानंतर न्या. धर्माधिकारी यांची प्रभारी मुख्य न्यायमूर्ती म्हणून नेमणूक करण्यात आली होती. तेव्हापासून ते या पदावर प्रभारी मुख्य न्यायमूर्ती म्हणून कामकाज सांभाळत होते. त्यानंतर बुधवारी त्यांच्या नियुक्तीसंदर्भात अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली. न्या. धर्माधिकारी जेमतेम सव्वा महिना या पदावर राहतील. कारण ते  २८ एप्रिल रोजी सेवानिवृत्त होणार आहेत. 

नागपुरात २० एप्रिल १९५८ रोजी जन्मलेल्या धर्माधिकारी यांनी बी. एस्सी (बायोलॉजी), बीए (इंग्रजी साहित्य) व एलएलबी असे शिक्षण घेतलं आहे. १९८०पासून नागपूरमधूनच त्यांनी आपला वकिली व्यवसाय सुरू केला. १५ मार्च २००४ रोजी मुंबई उच्च न्यायालयाचे अतिरिक्त न्यायमूर्ती म्हणून त्यांची नेमणूक करण्यात आली होती. तर १२ मार्च २००६ रोजी त्यांना न्यायमूर्तीपदी बढती मिळाली होती.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा