...आणि रस्त्यावर उतरले दीडशे बायकर्स!

Mumbai  -  

वडाळा - ही बाईक रॅली आहे चालकांच्या जनजागृती साठी..मुंबईच्या विविध भागातून आलेले हे दीडशे बायकर्स रस्ते सुरक्षा आणि इंधन बचतीबाबत मुंबईकरांमध्ये जनजागृत करत आहेत..आणि या जनजागृतीसाठी पुढाकार घेतलाय प्रादेशिक परिवहन विभागानं.

रस्ते सुरक्षा सप्ताहाच्या निमित्ताने काढण्यात आलेली ही बाईक रॅली वडाळ्याहून सुरू झाली आणि भांडूपमध्ये संपली. मुंबईच्या विविध भागातून आलेले हे तरुण मुंबईकर चालकांमध्ये जनजागृती करण्यासाठी एकत्र आलेत ही खरंच कौतुकास्पद बाब म्हणावी लागेल.

Loading Comments