Advertisement

नोव्हेबर महिन्यात जैववैद्यकीय कचऱ्याच्या प्रमाणात घट

जैववैद्यकीय कचरा जमा होण्याचं प्रमाण कमी झालं आहे. नोव्हेंबरमध्ये प्रतिदिन सरासरी ७५ टनांपर्यंत आलं आहे.

नोव्हेबर महिन्यात जैववैद्यकीय कचऱ्याच्या प्रमाणात घट
SHARES

जैववैद्यकीय कचरा जमा होण्याचं प्रमाण कमी झालं आहे. नोव्हेंबरमध्ये प्रतिदिन सरासरी ७५ टनांपर्यंत आलं आहे. कोरोना रुग्णसंख्या आणि अलगीकरण, विलगीकरण कक्ष कमी झाल्यानं तसंच, सुधारित नियमावलीनुसार इतर कचऱ्याची सरमिसळ कमी झाल्यानं सप्टेंबरमध्ये दरदिवशी १०० टनांपर्यंत जैववैद्यकीय कचरा जमा होण्याचं प्रमाण नोव्हेंबरच्या पहिल्या पंधरवड्यात घटून प्रतिदिन सरासरी ७५ टनांपर्यंत आले आहे. यात इतर जैववैद्यकीय कचऱ्याचं प्रमाण ५० टनांच्या आसपासच राहिलं असून कोरोना जैववैद्यकीय कचऱ्यामध्ये निम्म्यानं घट होऊन २५ टनांच्या आसपास राहिल्याची माहिती समोर येत आहे.

मार्चमध्ये कोरोनाचा संसर्ग वाढू लागल्यावर कोरोनाबाधितांच्या उपचारांदरम्यान तयार होणाऱ्या कचऱ्याची स्वतंत्रपणे विल्हेवाट लावण्यासाठी विशेष नियमावली तयार करण्यात आली. सुरुवातीस राज्यभरात १०-१५ टन जमा होणारा कोरोनाचा कचरा जुलैमध्ये ४० टनांपर्यंत गेला. जुलैपासून इतर वैद्यकीय उपचार वाढू लागल्यानंतर इतर जैववैद्यकीय कचऱ्याचं प्रमाण अचानक दुप्पट झालं. त्यामुळं दरदिवशी एकूण कचरा १०० टन होऊ लागला. सप्टेंबरमध्ये हा आकडा काही दिवसांना १०० टनपेक्षाही अधिक झाला.

दिलासा दायक बाब म्हणजे, नोव्हेंबरच्या पहिल्या पंधरवड्यात कोरोना रुग्णसंख्या कमी होत असताना अलगीकरण, विलगीकरण कक्ष कमी झाल्यानं तसंच, सुधारित नियमावलीनुसार इतर कचऱ्याची सरमिसळ थांबविल्यावर कोविड जैववैद्यकीय कचऱ्याचं प्रमाण ३० ते २५ टनांपर्यंत आल्याचं दिसून येतं. दरम्यान, इतर वैद्यकीय उपचार व्यवस्थित सुरू असल्याने त्याचे प्रमाण ५० टनच्या आसपास स्थिर राहिले.

राज्यातील जैववैद्यकीय कचऱ्याची विल्हेवाट २४ तासांच्या आत भस्मीकरणाद्वारे केली जाते. सुमारे ७५ किलोमीटर परिघात एक केंद्र यानुसार सर्व केंद्रांची एकूण क्षमता सुमारे ६० टन आहे. सप्टेंबरमध्ये वाढत्या कचऱ्याचा ताण केंद्रांवर येऊ लागल्यावर अतिरिक्त कोविड जैववैद्यकीय कचरा तळोजा येथील घातक कचरा विल्हेवाट केंद्रावर पाठविण्यात येऊ लागला. मात्र गेल्या महिनाभरात कोविड कचऱ्याचे प्रमां अर्ध्यावर आलं असून अन्यत्र कचरा विल्हेवाटीसाठी पाठविणं कमी झाल्याचं समजतं.

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा