Advertisement

'सायकल ट्रॅकसाठी महापालिकांना आर्थिक मदत करा' भाजपाची मागणी

मुंबई महापालिकेच्या माध्यमातून तानसा पाईपलाईनच्या शेजारी सायकल ट्रॅक बनवलं जाणार आहे. या सायकल ट्रॅकसाठी महापालिकेच्या माध्यमातून पैसा खर्च केला जात असला तरी मुंबई महानगर परीसरातील ज्या-ज्या स्थानिक स्वराज्य संस्था यासाठी पुढाकार घेत आहेत, त्या सर्वांना राज्य सरकारकडून अनुदान दिलं जावं, अशी मागणी भाजपचे महापालिका गटनेते मनोज कोटक यांनी केली आहे.

'सायकल ट्रॅकसाठी महापालिकांना आर्थिक मदत करा' भाजपाची मागणी
SHARES

आजच्या धकाधकीच्या जीवनातही नागरिकांना तंदरुस्त राहता यावं याकरता सायकल ट्रॅक प्रकल्प महत्त्वाचा आहे. त्यामुळे ज्या महापालिका सायकल ट्रॅक प्रकल्प तसेच सायकलिंगची ऍक्टिव्हिटी राबवतात, त्यांना राज्य सरकारने भरीव आर्थिक निधीची मदत करावी, अशी मागणी भाजपाने केली आहे.


'राज्य सरकारने अनुदान द्यावं'

मुंबई महापालिकेच्या माध्यमातून तानसा पाईपलाईनच्या शेजारी सायकल ट्रॅक बनवलं जाणार आहे. याच्या काही भागाच्या कामाला मंजुरी देण्यात आली आहे. तर उर्वरित भागात सायकल ट्रॅक बांधण्यासाठीची निविदा प्रक्रिया महापालिकेच्या माध्यमातून सुरू आहे. या सायकल ट्रॅकसाठी महापालिकेच्या माध्यमातून पैसा खर्च केला जात असला तरी मुंबई महानगर परीसरातील ज्या-ज्या स्थानिक स्वराज्य संस्था यासाठी पुढाकार घेत आहेत, त्या सर्वांना राज्य सरकारकडून अनुदान दिलं जावे, अशी मागणी भाजपचे महापालिका गटनेते मनोज कोटक यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. मुख्यमंत्र्यांनीही यावर सकारात्मक अनुकलता दर्शवली आहे.


'आर्थिक निधीची मदत करा'

एमएमआरडीए क्षेत्रातील ज्या महापालिका सायकल ट्रॅक प्रकल्प राबवत आहेत, त्यांना चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे ज्या महापालिका हे सायकल ट्रॅक प्रकल्प तसेच सायकलिंगची ऍक्टिव्हिटी राबवतात, त्यांना राज्य सरकारने भरीव आर्थिक निधीची मदत करावी, असं भाजपाचे मनोज कोटक यांनी आपल्या निवेदनात म्हटलं आहे.

या भरीव निधीची मदत करतानाच ज्या महापालिका हे प्रकल्प राबवत आहेत, त्यांचाही यथोचित सत्कार करण्यात यावा, अशी मागणीही त्यांनी केली आहे. राज्य सरकारने ही मदत प्रोत्साहनपर द्यावी, जेणेकरून अशाप्रकारचे प्रकल्प राबवण्यास इतर महापलिकांनाही प्रोत्साहन मिळेल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे ही मागणी केली असून त्यांनीही याला सकारात्मक अनुकलता दर्शवली, असल्याचं कोटक यांनी स्पष्ट केलं आहे.

मुंबई महापालिका मुलुंड ते अंधेरी सहार रोड या १४.१० किलोमीटर पट्ट्यात सायकल ट्रॅक उभारत आहे. याशिवाय कोस्टल रोडच्या सुमारे ९ कि.मीच्या प्रकल्प कामातही सायकल ट्रॅक उपलब्ध करून दिलं जाणार आहे.



हेही वाचा - 

बहुचर्चित सायकल ट्रॅकचा प्रस्ताव डोळेबंद करून मंजूर

खोदा पहाड, निकला... १ किमी सायकल ट्रॅकसाठी ११ कोटींचा खर्च

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा