Advertisement

जिवंत कोरोना रुग्णाला अंत्यसंस्कारासाठी नेलं? भाजपाच्या आरोपावर पालिकेचं ट्विटर वॉर

याबाबत मुंबई भाजपचे प्रवक्ते सुरेश नाखुआ यांनी एक ट्वीट केलंय. पण यावरून पालिका आणि त्यांच्यात ट्विटर वॉर सुरू आहे.

जिवंत कोरोना रुग्णाला अंत्यसंस्कारासाठी नेलं? भाजपाच्या आरोपावर पालिकेचं ट्विटर वॉर
SHARES

एका जिवंत असलेल्या कोरोना रुग्णाला कोरोना किटमध्ये बांधून अंत्यविधीसाठी स्मशानभूमीपर्यंत नेण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. स्मशानभूमीत आणल्यानंतर तो रुग्ण जिवंत असल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलंय.

याबाबत मुंबई भाजपचे प्रवक्ते सुरेश नाखुआ यांनी एक ट्वीट केलंय. “हे धक्कादायक आहे. एक जिवंत माणूस बीएमसीनं स्मशानभूमीत नेला. मला वाटतं की # महावसुली आघाडी सरकारचं स्मशानभूमीतून काही महावसुलीचं टार्गेट असेल,” असं सुरेश नाखुआ यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलंय.

नाखुआ यांनी हा व्हिडीओ ट्वीट केल्यानंतर मुंबई महापालिकेच्या ट्विटर हँडलवरुन त्याला उत्तर देण्यात आलंय. “सर, आपल्याशी झालेल्या दूरध्वनी संभाषणानुसार आम्ही तुम्हाला विनंती केली की, या व्हिडीओचं मूळ आणि सत्यता तपासून पाहा. मात्र, तुम्हालाही या व्हिडीओचं मूळ स्थान आणि सत्यतेबद्दल खात्री नव्हती. त्यामुळे आम्ही तुमच्याकडून माहितीची वाट पाहत आहोत. त्यानंतर याबाबत पुढील कारवाईचा विचार केला जाईल” असं ट्वीट मुंबई महापालिकेनं केलं आहे.

मुंबई महापालिकेच्या या ट्वीटला नाखुआ यांनी उत्तर दिलंय. “कृपया दिशाभूल करु नका. आपलं दूरध्वनीवर संभाषण झालं नाही. तर ते फक्त व्हॉट्सअपवरील संदेशाची देवाणघेवाण होती. मला या घटनेच्या स्थानाबाबत माहीत नाही. मी त्याबाबत माहिती घेत असल्याचं तुम्हाला सांगितलं. लोकांची दिशाभूल करु नये, अशी विनंती”, असं नाखुआ यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलंय.



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा