Advertisement

चेंबूर रेल्वे स्थानकाजवळील जनता मार्केटमध्ये भीषण आग

चेंबूरच्या रेल्वे स्थानकाच्या पूर्वेला लागूनच असलेल्या जनता मार्केटमध्ये गुरुवारी पहाटे ५ वाजता भीषण आग लागली.

चेंबूर रेल्वे स्थानकाजवळील जनता मार्केटमध्ये भीषण आग
SHARES

चेंबूरच्या रेल्वे स्थानकाच्या पूर्वेला लागूनच असलेल्या जनता मार्केटमध्ये गुरुवारी पहाटे ५ वाजता भीषण आग लागली. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या १० गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. अग्निशमन दलाच्या जवानांच्या शर्थीच्या प्रयत्नानंतर ही आग आटोक्यात आली. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही.

जनता मार्केटमधील रेल्वे स्थानकाच्या बाजूच्या एका झेरॉक्स दुकानाला प्रथम अचानक आग लागली. त्यानंतर या दुकानाला लागूनच असलेल्या इतर दोन ते तीन दुकानांत ही आग पसरली. परिसरात मोठ्या प्रमाणात आगीच्या ज्वाळा आणि धूर दिसत असल्यानं नागरिकांमध्ये देखील खळबळ उडाली होती. सुदैवाने या घटनेत कुठल्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही.

अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवेपर्यंत ४ ते ५ दुकानांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असून ती जाळून खाक झाली. जनता मार्केटमध्ये जवळपास १०० च्या आसपास झेराॅक्स, स्टेशनरीची दुकान आहेत. येथे लोकांची मोठी गर्दी असते. पण पहाटेची वेळ असल्यानं दुकानं बंद होती आणि त्यामुळे मोठी जीवितहानी टळली. ही आग नेमकी कशामुळे लागली याचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट आहे. या आगीत दुकानातील कागद, झेरॉक्स मशीन आणि फर्निचरचे मोठे नुकसान झाले आहे.



 हेही वाचा -  

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडून आरे आंदोलकांवरील आरोप मागे घेण्याचे निर्देश

चेंबूरमध्ये मेट्रो ४ लाईनसाठी १८ झाडं तोडण्यास महापालिकेची परवानगी


Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा