Advertisement

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडून आरे आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याचे निर्देश

ऑक्टोबर २०१९ मध्ये मेट्रो ३ लाइनसाठी प्रस्तावित कारशेडसाठी आरे कॉलनीतील झाडं तोण्याच्या विरोधात पर्यावरण प्रेमींनी आंदोलनं केली होती.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडून आरे आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याचे निर्देश
SHARES

आरेतील झाडे तोडण्याच्या विरोधात निषेध करणाऱ्या पर्यावरण प्रेमींवरील नोंदवण्यात आलेले गुन्हे मागे घ्यावेत असे निर्देश राज्याच्या गृह विभागाला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुधवारी दिले आहेत. ऑक्टोबर २०१९ मध्ये मेट्रो ३ लाइनसाठी प्रस्तावित कारशेडसाठी आरे कॉलनीतील झाडं तोण्याच्या विरोधात पर्यावरण प्रेमींनी आंदोलनं केली होती.

गेल्या वर्षी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी वृक्षतोडविरोधात निषेध नोंदवलेल्या कार्यकर्त्यांवरील दाखल खटले परत घेण्याचे आदेश दिले होते. राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनीही आपल्या ट्विटर हँडलवरून या निर्णयाची माहिती दिली.

आपल्या ट्विटमध्ये त्यांनी नमूद केलं की, त्यांनी आरे इथं गेल्या वर्षी झालेल्या आंदोलनाचा मंत्रिमंडळ बैठकीत मुद्दा उपस्थित केला होता आणि जितेंद्र आव्हाड आणि असलम शेख यांच्यासह अन्य राज्यमंत्री यांनी त्यांचं समर्थन केलं होतं.

"गेल्या वर्षी आरे इथं झाडे लावण्याच्या विरोधात निषेध करणार्‍यांवर खटल्यांचा मुद्दा मी आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत उपस्थित केला. मला @Awadspeaks जी आणि @AslamShaikh_MLA जी यांनी पाठिंबा दर्शविला. मंत्रिमंडळानं हे गुन्हे मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. मी मुख्यमंत्र्यांचे आभार मानतो."

त्याशिवाय आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी राज्यातील कोरोनाव्हायरसच्या सद्यस्थितीची आणि माझे कुटुंब, माझी जबाबदारी यांच्या अंमलबजावणीचा आढावा घेतला.Read this story in English
संबंधित विषय
Advertisement