रक्तदान करून साजरा झाला महाराष्ट्र दिन

 Gorai
रक्तदान करून साजरा झाला महाराष्ट्र दिन
Gorai, Mumbai  -  

महाराष्ट्र दिनानिमित्त गोराई येथील प्रगती विद्यालय येथे आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरातून 35 युनिट रक्त गोळा करण्यात तरुणांना यश आले आहे. स्वयम् युवा प्रतिष्ठान, मावळे आणि प्रगती विद्यालय यांच्या वतीने आयोजित केलेल्या या रक्तदान शिबिरात तरुणांसह परिसरातील नागरिकांनी सहभाग घेतला.

बोरिवली (प.) येथील नवजीवन रक्तपेढीच्या सहकार्याने पार पडलेल्या या शिबिरामध्ये विविध महाविद्यालयांच्या माजी राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस) विद्यार्थ्यांचा सहभाग होता. यावेळी प्रत्येक रक्तदात्याला भेटवस्तू आणि प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. प्रगती विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सुनिता वाघ, विद्यार्थी आणि शिक्षक वर्ग यांच्या उपस्थितीत यावेळी ध्वजारोहणाचाही कार्यक्रम संपन्न झाला.

‘संयुक्त महाराष्ट्र निर्मितीसाठी 105 हुतात्म्यांनी आपले बलिदान दिले. रक्तदान शिबिराचे आयोजन करून त्यांना मानवंदना देण्याचा आमचा दरवर्षी प्रयत्न असतो. यंदा या शिबिराचे तिसरे वर्ष होते आणि चांगल्या प्रमाणात यश लाभले याचा आनंद आहे,’

विवेक धराडे, आयोजक समिती सदस्य

शिबिराच्या एक दिवस आधी या तरुण मंडळीने ढोल-ताशाचे दमदार वादन करून परिसरामध्ये रक्तदानाबाबत जनजागृतीही केली.

Loading Comments