Advertisement

महालक्ष्मी रेसकोर्सवर थीम पार्क उभारण्याचा मार्ग मोकळा

महालक्ष्मी रेसकोर्सच्या एका भागाचे थीम पार्कमध्ये रूपांतर करण्याच्या प्रस्तावाला रॉयल वेस्टर्न इंडिया टर्फ क्लब (RWITC) कडून महाराष्ट्र सरकारने मान्यता प्राप्त केली आहे.

महालक्ष्मी रेसकोर्सवर थीम पार्क उभारण्याचा मार्ग मोकळा
SHARES

महालक्ष्मी रेसकोर्सवर (Mahalaxmi Race Course)  थीम पार्क उभारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.  त्यामुळे, रेसकोर्सच्या भाडेतत्त्वाचे नूतनीकरण करून 226 पैकी 120 एकर जागेवर थीम पार्क उभारता येणार आहे.

रॉयल वेस्टर्न इंडिया टर्फ क्लब (RWITC) ची काल यासंदर्भात आॅनलाइन बैठक पार पडली. या बैठकीत 1800 सदस्यांपैकी 708  सदस्य उपस्थित होते. ज्यातील 540 सदस्यांनी पुनर्विकास प्रस्तावाच्या बाजूने मतदान केले, तर 168 सदस्यांनी विरोधात मतदान केले. हा प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर आता रेसकोर्सच्या भाडेतत्त्वाचे नूतनीकरण करून रेसकोर्सच्या 226 एकर जागेपैकी 120  एकर जागेवर थीम पार्क उभारता येणार आहे. 

रेस कोर्स व्यवस्थापनावर करार करण्यासाठी दबाव

महालक्ष्मी रेसकोर्सचा भूखंड 1914 मध्ये व्यवस्थापनाला भाडेतत्त्वावर देण्यात आला होता, ही भाडेपट्टी 2013 सालात संपली. अलिकडेच, महालक्ष्मी रेसकोर्ससंदर्भात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार आदित्य ठाकरेंनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवरच आरोप केले होते. या जागेत व्यावसायिक बांधकामे आणि खासगी टॉवर होणार असल्याचा ठाकरेंचा दावा होता आणि त्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या जवळचा विकासक रेस कोर्स व्यवस्थापनावर करार करण्यासाठी दबाव आणत आणि धमकावत होता, असा आरोप केला होता. 

थीम पार्कसाठी 120 एकर तर टर्फ क्लबला 91 एकर जागेचे वाटप

दरम्यान, आरडब्ल्डूआयटीसीच्या सर्वसाधारण सभेनंतर आता राज्य सरकार, पालिका आणि रॉयल वेस्टर्स इंडिया टर्फ क्लबमध्ये कायदेशीर करार होताना दिसेल. ज्यात थीम पार्कसाठी 120 एकर तर टर्फ क्लबला 91 एकर जागेचे वाटप होईल. मात्र, ही मुंबईकरांच्या हक्काची जागा असल्याचा दावा माजी नगरसेवक मकरंद नार्वेकर यांनी केला आहे. त्यामुळे मुंबईकरांचं देखील मत विचारात घेतलं पाहिजे अशी प्रतिक्रिया दिली आहे.

शिवसेना ठाकरे गट काय भूमीका घेणार?

रेसकोर्सच्या जागेवरुन मागील अनेक दिवसांपासून वाद सुरु आहे. अशात, आता क्लबकडूनच पुर्नविकासावर मोहोर लावली गेली आहे. मात्र, यात देखील अनेक सदस्यांचा विरोध पाहायला मिळतोय.  त्यामुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब पक्षाचे आमदार आदित्य ठाकरे आपल्या मतदारसंघात असलेल्या रेसकोर्सबाबत आता पुढे काय भूमिका घेतात  हे बघणं महत्त्वाचे असेल



हेही वाचा

रेल्वे स्थानकांवर एसी वसतिगृह आणि एटीएम उभारण्यात येणार

अंबरनाथच्या शिवमंदिरात नारळ फोडण्यावर बंदी

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा