Advertisement

धोका टाळण्यासाठी पालिका, बेस्टच्या ५५ वर्षांवरील कामगारांना घरी थांबण्याचे आदेश


धोका टाळण्यासाठी पालिका, बेस्टच्या ५५ वर्षांवरील कामगारांना घरी थांबण्याचे आदेश
SHARES

कोरोनाचा धोका ५५ वर्षांवरील व्यक्तींना अधिक असल्याचं दिसून आलं आहे. त्यामुळं अशा कर्मचाऱ्यांना घरी राहण्याचं आदेश पोलीसांकडून देण्यात आले होते. याच धर्तीवर ५५ वर्षांवरील पालिका आणि बेस्ट कर्मचाऱ्यांनाही घरी थांबू द्या, अशी मागणी कामगार संघटनांनी केली होती. त्यानुसार पालिका आयुक्त प्रवीणसिंह परदेशी यांनी याबाबत आदेश जारी केले आहेत.

मुंबईत कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ झाली असून, साडेपाच हजार रुग्ण सापडले आहेत. यापैकी २५० लोकांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये ५५ वर्षांवरील व्यक्तीची संख्या अधिक आहे. ज्येष्ठ नागरिकांना या आजाराचा संसर्ग होण्याचा सर्वाधिक धोका असतो. त्यामुळं त्यांना घराबाहेर न पडण्याचं आवाहन पालिकेनं यापूर्वीच केलं आहे.

मधुमेह, हृदयविकार, मूत्रपिंड विकार असा त्रास असलेल्या ज्येष्ठांची तपासणी सुरू आहे. तसेच ५२ वर्षे वय असलेल्या आणि मधुमेह, हायपरटेन्शन असे दीर्घ आजार असल्यास त्यांनीही कामावर न येता घरीच थांबावे असे आदेश आयुक्तांनी दिले.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा