कचऱ्याची विल्हेवाट !

 Byculla
कचऱ्याची विल्हेवाट !

किल्लेदार स्ट्रीट - मुंबई लाइव्हच्या बातमीनंतर बाबुराव जगताप परिसरातल्या रहिवाशांची कचऱ्यातून मुक्तता झालीय. बाबुराव जगताप मार्गावरील किल्लेदार स्ट्रीट इथले रहिवासी कचऱ्याच्या समस्येने त्रस्त झाले होते. पालिकेच्या कचऱ्याच्या गाड्या नियमितपणे कचरा उचलत नव्हत्या. रहिवाशांच्या या समस्या मुंबई लाइव्हने मांडल्यानंतर अखेर पालिकेला जाग आली. त्यानंतर आता दिवसातून तीन वेळा कचरा गाडी कचरा उचलण्यास येते. या सोबतच परिसरात दोन कचरा कुंड्या अतिरिक्त ठेवण्यात आल्या आहेत अशी माहिती स्थानिकांनी दिली.

Loading Comments