अखेर मुलुंड जिमखान्याला महापालिकेचा दणका

मुलुंड -  पालिकेच्या टी विभागाने अखेर मुलुंड जिमखान्यावर कारवाईचे पाऊल उचलले. मुलुंड मधील प्रतिष्ठित समजला जाणारा तसेच अनेक उचभ्रू रहिवाश्यांचे विरंगुळ्याचे ठिकाण असलेल्या मुलुंड जिमखान्याला महापालिकेने देखभाल करण्यासाठी दिलेला तब्बल पाच हजार चौरस मीटर भूखंड गुरुवारी पालिकेने त्यांच्या ताब्यातून काढून जनतेसाठी मोकळा केला आहे. पालिका निवडणुकांच्या कालावधीत या मैदानावर जय्यत पार्टी आयोजित करण्यात आली होती. 

यावर राज्य उत्पादन शुल्क विभागाने धाड देखील टाकली होती. सामान्य जनतेसाठी असलेल्या मोकळ्या मैदानाचा मनमानी वापर मुलुंड जिमखान्याचे पदाधिकारी करीत असल्याचे समोर आले होते. खरेतर दत्तक तत्वावर देण्यात आलेल्या मैदानावर संबंधित संस्थांनी सर्व सामान्य जनतेच्या हितासाठी आणि मैदानाच्या विकासासाठी कार्य करणे गरजेचे होते. मात्र अनेक प्रतिष्ठित व्यक्ती या जिमखान्याचे पदाधिकारी असल्याने या ठिकाणी महापालिकेच्या कोणत्याही परवानग्या घेतल्या गेल्या नाहीत. तसेच मनमानी पद्धतीने कारभार सुरु ठेवला. मात्र हे सगळे आरोप या पदाधिकाऱ्यांनी फेटाळून लावत पालिकेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे.

Loading Comments