Advertisement

बिल्डिंग, घरदुरुस्तीसाठी परवानगीची गरज नाही, बीएमसीचं स्पष्टीकरण

मुंबईत अनेक ठिकाणी इमारती, घरांमध्ये दुरुस्ती, रंगकामे आदी सुरू असतात. मात्र, या कामांवेळी नियमभंगाचं कारण देत जाणूनबुजून पालिकेकडे अनेक तक्रारी केल्या जातात.

बिल्डिंग, घरदुरुस्तीसाठी परवानगीची गरज नाही, बीएमसीचं स्पष्टीकरण
SHARES

इमारती आणि घरांमधील दुरुस्तीच्या कामांसाठी पालिकेच्या परवानगीची आवश्यकता नाही, असं मुंबई महापालिकेने स्पष्ट केलं आहे. याबाबत पालिकेच्या परिमंडळ ३ मधील अंधेरी पूर्व, वांद्रे पूर्व आणि पश्चिम विभागात जनजागृती मोहीम सुरू केली आहे.

मुंबईत अनेक ठिकाणी इमारती, घरांमध्ये दुरुस्ती, रंगकामे आदी सुरू असतात. मात्र, या कामांवेळी नियमभंगाचं कारण देत जाणूनबुजून पालिकेकडे अनेक तक्रारी केल्या जातात. प्रत्यक्षात अधिकृत ठिकाणी दुरुस्तीसह इतर कामांना कोणतीही आडकाठी नसते. अशा प्रकारच्या कामांना पालिकेच्या मंजुरीचीही आवश्यकता नसते. ही बाब सर्वांना माहीत होण्यासाठी पालिकेच्या परिमंडळ ३ ने पुढाकार घेतला आहे. विकास आराखडा २०३४ मध्येही इमारत, घरांतील दुरुस्ती वा इतर कामांसाठीही परवानगी घेण्याची आवश्यकता नसल्याचे पालिकेने नमूद केलं आहे.

परिमंडळ ३ मधील अंधेरी पूर्व, वांद्रे पूर्व, वांद्रे पश्चिममध्ये जनजागृती केली जात आहे. येथील पालिका कार्यालयांमध्ये माहितीफलक लावले गेले आहेत. आता  विभागांमधील इमारती, सार्वजनिक ठिकाणी असे फलक ठेवले जाणार आहेत.  याबाबत परिमंडळ ३ चे उपायुक्त पराग मसुरकर म्हणाले की, कोणत्या कामांसाठी परवानगी घेताना कोणती कागदपत्रे लागतात, त्याची पूर्तता, कालावधी आदी गोष्टी सोप्या भाषेत समजावण्याचा उद्देश आहे. केवळ दुरुस्तीपुरताच मुद्दा मर्यादित न ठेवता इमारतींच्या गच्चीवर सौरउर्जेचे पॅनेल बसविण्यासाठीही पालिका परवानगी गरजेची नाही.



हेही वाचा -

नोकरी पाहिजे? मग 'या' WhatsApp नंबरवर 'Hi' पाठवा

शाळा, महाविद्यालयांच्या मैदानाचा वाहन प्रशिक्षणासाठी होणार वापर?



Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा