कांदिवलीत फेरीवाल्यांवर कारवाई

 Kandivali
 कांदिवलीत फेरीवाल्यांवर कारवाई
 कांदिवलीत फेरीवाल्यांवर कारवाई
 कांदिवलीत फेरीवाल्यांवर कारवाई
See all

कांदिवली - महानगरपालिकेच्या आर दक्षिण पालिका विभागाने शुक्रवारी पुन्हा फेरीवाल्यांवर कारवाई केली. कांदिवली स्थानक पूर्वपासून कांदिवली पश्चिमेपर्यंत ही कारवाई करण्यात आली.

पालिकेच्या आर दक्षिण विभागाचे अतिक्रमण विरोधी अधिकारी राठोड यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली. या कारवाईंतर्गत माघुरादास रोड फेरीवाला मुक्त करण्यात आला. फेरीवाले जागा अडवून बसत असल्याने वाहतूक कोंडी होत होती. तसेच पादचाऱ्यांनाही चालताना त्रास सहन करावा लागत होता.

"शुक्रवारी कांदिवली पूर्व स्थानक परिसरापासून कांदिवली पश्चिमेपर्यंत पुरेशा पोलीस बंदोबस्तात ही कारवाई कारण्यात आली", असे पालिका अधिकारी राठोड यांनी मुंबई लाईव्हशी बोलताना सांगितले. मात्र ही कारवाई म्हणजे सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची पायमल्ली असल्याचे फेरीवाले संघटनेतर्फे अखिलेश गौड यांनी सांगितले.

Loading Comments