Advertisement

विनामास्क फिरणाऱ्या विरोधात कारवाई; महापालिकेची १७ कोटींची कमाई

मुंबई महापालिकेनं कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मार्चपासून विविध उपाययोजना वेळोवेळी नागरिकांच्या हितासाठी अंमलात आणल्या आहेत.

विनामास्क फिरणाऱ्या विरोधात कारवाई; महापालिकेची १७ कोटींची कमाई
SHARES

कोरोनाच्या प्रादुर्भावाला आळा घालण्यासाठी मास्कचा नियमित वापर अत्यावश्यक आहे. या नियमांचं उल्लंघन करणाऱ्या नागरिकांवर आर्थिक दंडाची कारवाई केली जात आहे. तसंच, संबंधितांना एक मास्क विनामूल्य देण्याचा निर्णय मुंबई महानगरपालिका प्रशासनानं घेतला आहे. त्यामनुसार, महापालिकेनं २० एप्रिल ते २३ डिसेंबर या कालावधीत विना मास्क आढळलेल्या ८ लाख २० हजार १६७ नागरिकांवर कारवाई करत १६ कोटी ७६ लाख ६७ हजार ६०० रुपयांचा दंड वसूल केला आहे.

मुंबई महापालिकेनं कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मार्चपासून विविध उपाययोजना वेळोवेळी नागरिकांच्या हितासाठी अंमलात आणल्या आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वोत्तम उपाय म्हणजे नागरिकांनी मास्क वापरणं आवश्यक आणि जरुरीचं आहे. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी विना मास्क घराबाहेर फिरणाऱ्या नागरिकांना २०० रुपये दंड ठोठावण्याचे आदेश दिले होते. तसंच, मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील सर्व २४ विभाग कार्यालयांच्या हद्दीत विना मास्क फिरणाऱ्या नागरिकांवर अधिकाधिक कारवाई करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार, आतापर्यंत ८ लाख २० हजार १६७ नागरिकांवर कारवाई करून सुमारे १६ कोटी ७६ लाख ६७ हजार ६०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

मास्क नसल्यास दंड केल्यानंतर संबंधित नागरिक पुन्हा विना मास्क पुढे जातात. त्यामुळं मास्क वापराच्या मूळ उद्दिष्टांची पूर्तता व्हावी, यासाठी दंड करण्यासोबत संबंधित नागरिकास एक मास्क देखील बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून मोफत पुरविला जात आहे. मास्क मोफत दिल्याची नोंद संबंधित दंडाच्या पावतीवर देखील केली जात आहे.

मुंबई महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी १४ ऑक्टोबररोजी बैठक घेऊन विना मास्क फिरणाऱ्या व सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक स्वरूपाची कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार, प्रशासनानं प्रत्येक प्रशासकीय विभाग कार्यालयात यासाठी पथके तयार केली आहेत.

या पथकात पर्यवेक्षक, कनिष्ठ अवेक्षक, मुकादम, उपद्रव शोधक याच बरोबर विभागात कार्यरत असणाऱ्या अधिकाऱ्यांना समाविष्ट करण्यात आले आहे. विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांवर कारवाई करून दंड ठोठावण्याचे अधिकार त्यांना प्रदान करण्यात आले आहेत. तसंच, क्लीन-अप मार्शल ही नियुक्त करण्यात आले आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ही कार्यवाही अत्यंत महत्वाची ठरते आहे.

महापालिकेची कारवाई

झोन
व्यक्ती
दंड रुपये
झोन 1
1,16,765 
2,39,23,500
झोन 2
1,50,572 
3,04,45,700
झोन 3
1,06,737
2,26,32,400
झोन 4
1,26,334 
2,58,16,200
झोन 5
93,918
1,90,00,300
झोन 6
1,11,538
2,23,51,000
झोन 7
1,14,312
2,34,98,500
एकूण
8,20,167
16,76,67,600
Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा