Advertisement

LIVE : मुंबई महापालिका बजेट २०१८-१९


LIVE : मुंबई महापालिका बजेट २०१८-१९
SHARES

महापालिकेचा २०१८-१९ या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प शुक्रवारी सादर करण्यात आला आहे. पालिका आयुक्त अजोय मेहता यांनी स्थायी समिती अध्यक्ष रमेश कोरगावकर यांना हा अर्थसंकल्प सादर केला. पण यावेळच्या अर्थसंकल्पात कोणत्याही मोठ्या घोषणा होतील याची शक्यता फारच कमी आहे. कारण आर्थिक वर्ष संपण्यास दोन महिने शिल्लक असताना पालिकेची तिजोरी रिकामी असल्याचं दिसून येत आहे.

पालिका आयुक्त अजोय मेहता यांचा हा तिसरा अर्थसंकल्प आहे. एप्रिल २०१५ मध्ये त्यांची पालिकेच्या आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली होती. 

३.४७ - देवनारमधील कत्तलखान्याच्या आधुनिकीकरणासाठी १० कोटींची तरतूद

३.४५ - मुंबईतील सागरी किनाऱ्यांच्या सुशोभिकरणासाठी १० कोटींची तरतूद

३.४० - नवीन अग्निशमन केंद्रांसाठी २९.९७ कोटींची तरतूद 

३.३९ - मेडिकल आणि डेंटल कॉलेजसाठी १० कोटी रुपयांची तरतूद

३.३५ - केईएम, सायन, नायर रुग्णालयांमध्ये उभारण्यात येणाऱ्या कॅथलॅबसाठी १२ कोटी रुपये मंजूर

३.३३ - केईएम, कुपर रुग्णालयासाठी नवीन डीएसएस, डिजिटल सबस्टेशन अॅन्जिओग्राफी मशीन खरेदी करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात

३.२९ - पालिका मुख्यालय आणि शहरातील इतर कार्यालयांमध्ये सीसीटीव्ही लावण्यासाठी ७ कोटींची तरतूद  

३.२७ - प्राण्यांपासून माणसांना होणाऱ्या रोगांच्या निदानासाठी झुनॉटिक लॅब तयार करणार

३.२५ - क्षयरोग नियंत्रणासाठी २०१८-१९ च्या अर्थसंकल्पात १३.५० कोटींची तरतूद

३.२४ - विशेष मुलांसाठी, बेलासिस रोड, नागपाडा ई-विभाग येथे नायर रुग्णालयाच्या मार्गदर्शनाखाली अर्ली इंटरव्हेंशन सेंटर प्रस्तावित 

३.२२ - १००० महिलांना सॅनिटरी पॅड बनवण्याचं प्रशिक्षण देण्यात येईल. त्यासाठी यंत्रसामुग्री, अर्थसहाय्यही देणार. या व्यवसायासाठी महापालिकेची जागा ११ महिन्यांसाठी उपलब्ध करून देणार. शाळा, प्रसुतीगृहे, रुग्णालये या ठिकाणी बाजारपेठ उपलब्ध करून दिली जाईल

३.२० - वांद्रे किल्ल्याच्या सुशोभिकरणासाठी ५ कोटींची तरतूद 

३.१९ - टीबीसाठी ३.५ कोटींचा विशेष निधी

३.१८ - पश्चिम उपनगरांमध्ये पाणीपुरवठ्यासाठी ३५ कोटींची तरतूद, पवई ते घाटकोपर आणि पवई ते विरावली अशा दोन भूयारी पाईपलाईन टाकणार

३.१७ - दिव्यांगांसाठी बेस्टबसमध्ये मोफत प्रवास

३.१६ - गावठाण कोळीवाडे आणि आदिवासी पाडे १५.६ कोटी, आधार केंद्रे १.०४ कोटी, गलिच्छ वस्त्याची दारजोन्नती ६९५.०७ कोटी, गरीब वर्गासठीच्या चालींसाठी इमारती सुधारणेच्या व्यवस्थापनासाठी ३५०.७१ कोटी

३.१५ - सायन रुग्णालयासाठी १ हजार कोटींची तरतूद, १८०० खाटा आणि इतर सुविधांसाठी दिला निधी

३.१४ - अग्निशमन दलातील कर्मचाऱ्यांच्या विम्याचा हफ्ता पालिका भरणार

३.१२ - टाटा कंपाऊंड येथील हिंदुहृदयसमाट बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय महाविद्यालयाकरता वसतीगृहाचं बांधकाम लवकरच सुरू होणार आहे. केईएम, शीव, नायर रुग्णालयाकरता वडाळा येथील कुष्ठरोग रुग्णालय, सायन कोळीवाडा आणि हाजी अली येथे वसतीगृह उभारण्यात येणार आहे. याबाबतची निविदा प्रक्रिया सुरू झाली आहे. यासाठी १५ कोटींची तरतूद

३.११ - रुग्णालयांमध्ये २३० व्हेंटिलेटर येणार, १६ कोटींची तरतूद

३.१० - अग्निशमन विभागात ९६ महिला कर्मचाऱ्यांचा समावेश

३.०८ - विविध सेवा व शैक्षणिक उपक्रमांसाठी केईएम रुग्णालयात दोन मजली टॉवर उभारण्याची योजना. जुलै २०१८ पासून या कामाला सुरुवात होईल. या बांधकामासाठी 6 लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे

३.०७ - नायर रुग्णालयाच्या इमारतीची दुरुस्ती करण्यात येणार, याकरता ४ कोटींची तरतूद

३.०५ - मुंबईत ७ सांडपाणी प्रक्रियाकेंद्र उभारणार, ५३८ कोटींची तरतूद 

३.०४ - भायखळा प्राणी संग्रहालयाचा ७ एकर पर्यंत विस्तार होणार, मफतलाल मिल कंपाऊंडच्या जागेवर होणार विस्तार

३.०२ - २५ दवाखाने दुरुस्ती करता निश्चित करण्यात येणार आहे. गरिबांना प्राथमिक स्तरावरील वैद्यकीय उपचार प्राप्त करून देण्याच्या दृष्टीकोनातून त्यांना दर्जेदार करण्यात येतील. संसर्गजन्य, मधुमेह आणि उच्चरक्तदाब या आजारावर आवश्यक असलेल्या दर्जेदार उपकरणांनी दवाखाने सुसज्ज केले जातील. याकरता अर्थसंकल्पात १.०५ कोटींची तरतूद

३.०२ - शिघ्रकृती वाहनांसाठी ४३० कोटींची तरतूद, आपतकालिन परिस्थितीमध्ये या वाहनांचा होणार उपयोग 

३.०१ - मलनिस्सारण व्यवस्था पूर्णपणे यांत्रिक करण्यासाठी ४२.४५ कोटींची तरतूद

३.०० - गावठाण कोळीवाडे आणि आदिवासी पाड्यांसाठी १५.६ कोटी

२.५९ - तानसा पाईपलाईनच्या बाजूला सायकल ट्रॅक तयार करणार, १०० कोटींची तरतूद

२.५८ - शहरी गरिबांना सेवा पुरावण्यामध्ये एकूण ८४७२ कोटी एवढ्या रक्कमेची तरतूद करण्यात आली आहे

२.५७ - मुंबईतील राहिवाशांसाठी वैद्यकीय सेवांच्या दरात अंदाजे २० टक्के इतकी वाढ, तर मुंबई बाहेरील रहिवाशांसाठी ३० टक्के पर्यंत वाढ, ज्येष्ठ नागरिकांना मोफत उपचार

२.५६ -१५ अतिरिक्त रात्र निवारे उभारणार, रात्र निवाऱ्यांची संख्या १० वरून २५ वर, ५ कोटींची तरतूद,

२.५६ - मुंबईत सार्वजनिक शौचालयांवरच्या जाहिरातीमधून महसूल उत्पन्न मिळवणार

२. ५५ - आपत्ती व्यवस्थापनासाठी ११.६९ कोटींची तरतूद

२.५२ - पूर नियंत्रणासाठी ५३ कोटींची तरतूद

२.५० - संपूर्ण मुंबईत मॅनहोलमध्ये १४५० जाळ्या बसवणार

२.४७ - स्वच्छ भारतसाठी १० कोटींची तरतूद

२.४५ - अग्निशमन विभागासाठी १८० कोटींची तरतूद

२.४० - पावसाळ्यात खड्डे बुजवण्यासाठी विशेष प्लांट तयार करणार

२.३५ - संपूर्ण मुंबईत एलईडी दिवे लावणार, पालिकेकडून अर्थसंकल्पात २८ कोटींची तरतूद

२.३३ - मुंबईत पार्किंग लॉट तयार करणार, पार्किंग व्यवस्थेसाठी १ कोटींची तरतूद

२.३० - पालिकेची आर्थिक स्थिती चांगली नाही, पालिका आयुक्तांची सभागृहात कबुली

२.२८ - महालक्ष्मी ते हाजीअली आणि महालक्ष्मी ते वरळीनाका असे दोन नवीन उड्डाणपूल बांधणार

२.२६ - मुंबईतल्या रस्त्यांसाठी १२०२ कोटींचा निधी

२.२३ - गोरेगाव मुलुंट जोडरस्त्यासाठी १०० कोटींची तरतूद

२.२१ - पालिका बजेटमध्ये मुंबईकरांना दिलासा, विद्यमान करांमध्ये वाढ किंवा नवे कर प्रस्तावित नाही

२.२० - कोस्टल रोडसाठी १५०० कोटींची तरतूद

२.१७ - मुंबई महापालिकेचा सन २०१८-१९चा  २७२५८.०७ कोटींचा अर्थसंकल्प आयुक्तांनी मांडला

२.१५ - मुंबई महापालिकेचा सन २०१८-१९चा अर्थसंकल्प महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी स्थायी समिती अध्यक्ष रमेश कोरगावकर यांना सादर केला

१.२३ - विद्यार्थ्यांचे लेखन कौशल्य सुधारण्यासाठी 'अक्षरशिल्प प्रकल्प'

१.२२ - ३४५ शालेय इमारतीमध्ये ३८१ सॅनिटरी नॅपकिन वेंडिंग मशीन बसवणार

१.२० - महापालिका शाळांच्या मुलांना फुटबॉल प्रशिक्षण

१.१८ - मुलींना स्वसंरक्षण प्रशिक्षण

१.१५ - कौशल्य विकास व व्यावसायभिमुख मार्गदर्शन

१.१२ - महापालिका शालेय विद्यार्थ्यांना मोफत बस प्रवास

१.०९ - हस्ताक्षर सुधारण्यास आरक्षित प्रस्ताव   

१.०८ - शालेय विद्यार्थ्यांना सुकामेवा दिला जाणार

१.०५ - शाळांत सीसीटीव्ही कॅमेरे लागणार

१.०४ - १३०० शाळांना डिजिटल करण्याचा प्रस्ताव

१.०० - ३१६ नवीन बालवाडी उघडणार

१२.५७ - कमी पटसंख्यामुळे बंद झालेल्या शाळांसाठी उपाय

१२.५३ - मध्यान भोजनासह पूरक पोषण आहार देणार

१२.५० - पुढील काही वर्षांत ६४९ द्विभाषिक शाळांचा प्रस्ताव 

१२.४७ - महापालिका शाळांची खासगीकरणाकडे वाटचाल

१२.४२ - ३५ शाळा खासगी लोकसहभागातून सुरू करणार

१२.४० - मनपा शालेय विद्यार्थ्यांना मोफत बससेवा योजना

१२.३५ - मुंबई महापालिकेच्या शिक्षण विभागाचा सन २०१८-१९चा अर्थसंकल्प अतिरिक्त आयुक्त आबासाहेब जऱ्हाड यांनी शिक्षण समिती अध्यक्षा शुभदा गुडेकर यांना सादर केला तब्बल २५६९ कोटींचा हा अर्थसंकल्प मांडण्यात आला.


मुंबईकरांना काय मिळणार?

पालिका रुग्णालयांत अतिरिक्त सुविधांवर जास्तीचं शुल्क आकारण्याचा प्रस्ताव पालिकेनं यापूर्वीच मंजूर केला आहे. त्याची अंमलबजावणी या आर्थिक वर्षात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुंबईबाहेरून येणाऱ्या रुग्णांना ३० टक्के आणि मुंबईतील रुग्णांना २० टक्के जास्तीचं शुल्क मोजावे लागणार आहे. सध्या जीएसटी लागू झालं आहे. त्यामुळे महापालिकेला जकातीतून मिळणाऱ्या उत्पन्नावर टाळं लागलं आहे. दुसरीकडे मालमत्ता करातूनही महसूल वसुली होत नसल्याने सर्व करांचा बोचा मुंबईकरांवर लादण्याची शक्यता आहे.  


नवे प्रकल्प घोषित होणार?

महापालिकेचे अनेक मोठे प्रकल्प सुरू आहेत. त्यामुळे जुने प्रकल्प पूर्ण करण्यावर अधिक भर देण्याच्या निर्णयाची शक्यता आहे. यासोबतच कफ परेड येथील सेंट्रल पार्क, कोस्टलरोडसाठी भरीव तरतूद, क्रीडा संकूल, उद्यानं, मैदानं, नवे तरण तलाव तयार करणे, सायकल ट्रॅक, भूमिगत वाहनतळ, नागरिकांच्या सुविधांवर भर दिला जाईल.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा