Advertisement

कमला मिल आग: ९ कामचुकार अधिकाऱ्यांना महापालिकेची नोटीस

पबमध्ये नियमबाह्य बांधकाम करण्यात आलं होतं. दोन्ही पबमध्ये हुक्का पार्लर चालवण्यात येत होता. तिथं लाकडी फर्निचर होतं, असं असूनही आग विझवण्यास कामी येणारे पाणी फवारणारे स्प्रिकलर्स, फायर अलार्म कार्यरत नव्हते. त्यामुळे या पबला परवानगीच कशी देण्यात आली? यावर मोठं प्रश्नचिन्ह उभं राहिलं. सहाजिकच सर्व रोख या पबला परवानगी देणाऱ्या महापालिका अधिकाऱ्यांवर रोखला गेला.

कमला मिल आग: ९ कामचुकार अधिकाऱ्यांना महापालिकेची नोटीस
SHARES

कमला मिल आग प्रकरणात हलगर्जीपणा करणाऱ्या मुंबई महापालिकेच्या ९ अधिकाऱ्यांना महापालिका आयुक्त अजोय मेहता यांच्या निर्देशानुसार नोटीस पाठवण्यात आली आहे. या अधिकाऱ्यांना आपलं म्हणणं मांडण्यास १५ दिवसांची मुदत देण्यात आली आहे. या नोटीशीचं समाधानकारक उत्तर न दिल्यास या अधिकाऱ्यांना पगारवाढ किंवा नोकरीला मुकावं लागू शकतं.


अक्षम्य हलगर्जीपणा

गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात कमला मिल कंपाऊंडमधील मोजोस बिस्ट्रो आणि वन अबोव्ह या पबला आग लागून त्यात १४ जणांचा मृत्यू झाला होता. अग्निशमन दलाने केलेल्या चौकशीत हे दोन्ही पब अग्निशमन नियमांचं उल्लंघन करून सुरू असल्याचं निर्दशनास आलं होतं. पबमध्ये नियमबाह्य बांधकाम करण्यात आलं होतं. दोन्ही पबमध्ये हुक्का पार्लर चालवण्यात येत होता. तिथं लाकडी फर्निचर होतं, असं असूनही आग विझवण्यास कामी येणारे पाणी फवारणारे स्प्रिकलर्स, फायर अलार्म कार्यरत नव्हते. त्यामुळे या पबला परवानगीच कशी देण्यात आली? यावर मोठं प्रश्नचिन्ह उभं राहिलं.


हे आहेत ९ अधिकारी

सहाजिकच सर्व रोख या पबला परवानगी देणाऱ्या महापालिका अधिकाऱ्यांवर रोखला गेला. नोटीस पाठवण्यात आलेल्या अधिकाऱ्यांमध्ये सहायक अभियंता मधुकर शेलार, उप-अभियंता दिनेश महाले, कनिष्ठ अभियंता धनराज शिंदे, सहायक विभागीय अग्निशमन अधिकारी एस. एस. शिंदे, सहायक कार्यकारी आरोग्य अधिकारी डाॅ. राजेश मदन, अग्निशमन तळ अधिकारी राजेंद्र पाटील, सहायक अभियंता मनोहर कुलकर्णी, सहायक विभागीय अग्निशमन अधिकारी संदीप शिंदे आणि स्वच्छता निरीक्षक प्रदीप शिर्के यांचा समावेश आहे.


आणखी तिघांचा समावेश

याशिवाय आणखी ३ अधिकाऱ्यांवर आग प्रकरणात हलगर्जीपणा केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. यामध्ये प्रशांत सपकाळे, भाग्यश्री कापसे आणि सतीश शिंदे यांचा समावेश आहे. आग लागली तेव्हा सपकाळे जी दक्षिण विभागाचे सहायक आयुक्त होते, या दोन्ही पबला परवाना देताना कापसे जी दक्षिण विभागाच्या सहायक आयुक्त होत्या. तर सतीश शिंदे आरोग्य अधिकारी होते.

या अधिकाऱ्यांना आपल्यावरील आरोपांचं लिखित स्वरूपात उत्तर द्यायचं आहे. हे अधिकारी आपल्यावरील आरोपाचं खंडन करण्यात अपयशी झाल्यास त्यांना मोठ्या शिक्षेला सामोरं जावं लागू शकतं.हेही वाचा-

निष्काळजीपणा! ३ वर्षात ३ हजार सोसायट्यांना अग्निशमन दलाच्या नोटीसा

कमला मिल आग: महापालिकेला अहवाल सादर करण्याचे हायकोर्टाचे निर्देशRead this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा