Advertisement

तर लाॅकडाऊन अटळ! महापालिका आयुक्तांनी दिला निर्वाणीचा इशारा

लाॅकडाऊन होणार की नाही हे लोकांनी ठरवायचंय, हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं म्हणणं योग्यच आहे. हजारोंच्या संख्येनं लोकं विनामास्क घराबाहेर फिरायला लागली, तर आपल्याला कुठल्याही परिस्थितीत लॉकडाऊन टाळता येणार नाही.

तर लाॅकडाऊन अटळ! महापालिका आयुक्तांनी दिला निर्वाणीचा इशारा
SHARES

लाॅकडाऊन होणार की नाही हे लोकांनी ठरवायचंय, हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं म्हणणं योग्यच आहे. हजारोंच्या संख्येनं लोकं विनामास्क घराबाहेर फिरायला लागली, तर आपल्याला कुठल्याही परिस्थितीत लॉकडाऊन टाळता येणार नाही. मुंबईसाठी (mumbai) पुढील ८ ते १५ दिवस अतिशय महत्त्वाचे आहेत. त्यामुळे जबाबदारीने वागा, असा निर्वाणीचा इशारा मुंबई महापालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी दिला आहे.

एका वृत्तवाहिनीशी बोलताना मुंबईतील कोरोनाबाधित रुग्णांच्या वाढत्या संख्येवर चिंता व्यक्त करताना इकबाल सिंह चहल म्हणाले, राज्यात लाॅकडाऊनमध्ये शिथिलता दिल्यानंतर आणि कोरोना प्रतिबंधक लसीकरणाला सुरूवत झाल्यावर कोरोना (coronavirus) पूर्णपणे संपल्याचं लोकांना वाटत आहे. मात्र लोकं जितक्या बेफिकीरीने वागत आहे ते फार धोक्याचं आहे. त्यामुळे लॉकडाऊन होणार की नाही हे लोकांनी ठरवायचं हे मुख्यमंत्री योग्यच बोलले आहेत. लोकांनी शिस्त पाळायला हवी. मास्क वापरायला हवा. गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळायला हवं. लोकांनी गर्दी केली नाही, तर लॉकडाऊनची वेळ येणारच नाही. पण, हजारोंच्या संख्येनं लोकं विनामास्क बाहेर फिरायला लागले, तर आपल्याला लॉकडाऊन टाळता येणार नाही. त्यादृष्टीने मुंबईसाठी पुढील ८ ते १५ दिवस फार महत्त्वाचे आहेत, असं इकबाल सिंह चहल यांनी स्पष्ट केलं.

मागील ३ महिन्यात मुंबई महापालिकेने (bmc) विनामास्क फिरणाऱ्या १६ लाख लोकांना दंड आकारला आहे. रविवारी आम्ही १६ हजार ४०० लोकांकडून दंड वसूल केला. आता सार्वजनिक ठिकाणी विनामास्क फिरणाऱ्या २५ हजार लोकांकडून दररोज दंड वसूल करण्याचं टार्गेट मार्शल्सला देण्यात आलं आहे, अशी माहिती इकबाल सिंह चहल यांनी दिली.

हेही वाचा- काॅलेज सुरू राहणार की पुन्हा बंद? उदय सामंत यांनी दिली महत्त्वाची माहिती

माझ्याकडे नुकतेच दोन व्हिडिओ आले होते. त्यापैकी एक व्हिडिओ चौपाटीवरचा होता. तिथं हजारो लोकं विनामास्क फिरत होते. तर दुसऱ्या व्हिडिओत एका लग्न समारंभात देखील असंच दृश्य होतं. अशा दोन्ही ठिकाणी संबंधितांना गाठून दंड ठोठावण्यात आला. महापालिकेने अनेक ठिकाणी पबवरही धाडी टाकून दंड वसुली केली आहे. मात्र हा सगळा बेशिस्तपणा असून तो त्वरीत थांबायला हवा, असा इशारा देखील इकबाल सिंह चहल यांनी दिला.

दरम्यान, मास्क घाला, शिस्त पाळा आणि लॉकडाऊन टाळा असं स्पष्टपणे सांगून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांनी राज्यात कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी ‘मी जबाबदार’ या मोहिमेची घोषणा केली. गर्दी वाढत असून  राजकीय, सामाजिक, धार्मिक अशा कार्यक्रमांना परवानगी मिळणार नाही तसंच नियम न पाळणारी मंगल कार्यालये, सभागृहे, हॉटेल्स, उपाहारगृहे यांच्यावर कडक कारवाई करण्याचे निर्देश प्रशासनाला दिल्याचंही ते म्हणाले. 

कोरोना संसर्ग (covid19) रोखण्यासाठी अमरावती विभागात कडक निर्बंध घालण्यात आले आहेत त्याचा संदर्भ देऊन जिथं जिथं आवश्यकता असेल तिथल्या जिल्हा प्रशासनाने आवश्यक ते निर्बंध घालण्याचे निर्देश आपण दिले आहेत, अशी माहिती वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जनतेला दिली.

(bmc commissioner iqbal singh chahal warns people in mumbai on lockdown and covid 19)


Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा