Advertisement

काॅलेज सुरू राहणार की पुन्हा बंद? उदय सामंत यांनी दिली महत्त्वाची माहिती

महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये कोरोना विषाणूच्या संसर्गाने पुन्हा डोकं वर काढल्याने काही दिवसांपूर्वीच उघडण्यात आलेले शाळा-काॅलेज सुरूच राहणार की बंद करणार असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे.

काॅलेज सुरू राहणार की पुन्हा बंद? उदय सामंत यांनी दिली महत्त्वाची माहिती
SHARES

महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये कोरोना विषाणूच्या (coronavirus) संसर्गाने पुन्हा डोकं वर काढल्याने काही दिवसांपूर्वीच उघडण्यात आलेले शाळा-काॅलेज सुरूच राहणार की बंद करणार असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे. त्यावर राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी भूमिका स्पष्ट केली आहे. काॅलेज सुरू ठेवण्याचा निर्णय कुलगुरू आणि जिल्हाधिकाऱ्यांनी चर्चा करून घ्यावा. तसे निर्देश राज्य सरकारकडून त्यांना देण्यात आले असल्याची माहिती उदय सामंत यांनी दिली आहे.

कोरोनाबाधित रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे राज्यातील मुंबई, पुणे, नागपूर, अमरावतीसह काही जिल्ह्यात पुन्हा निर्बंध घालण्यात आले आहेत. त्यामुळे ज्या ठिकाणी शाळा-काॅलेज सुरू करण्यात आले होते, त्या सुरू ठेवणार की बंद करणार हा या प्रश्नाने विद्यार्थी आणि पालक चिंताग्रस्त झाले आहेत. त्यातच काही काॅलेजांनी परीक्षांची तयारी सुरू केल्याने परीक्षांचं काय होणार? असा प्रश्नही उपस्थित होऊ लागला आहे. त्यावर उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत (uday samant) यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.

हेही वाचा- SSC आणि HSC च्या अभ्यासक्रमात कपात करण्याची शिक्षकांची मागणी

ज्या जिल्ह्यात कोरोनाचे (covid19) रुग्ण वाढतील, जिथं कंटेन्मेंट झोन तयार होतील. त्या जिल्ह्यात कुठल्या गोष्टींवर निर्बंध घालायचे याबाबतचा निर्णय जिल्हाधिकारी यांच्यावर सोपवण्यात आलेला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढून त्याचा फटका विद्यार्थी आणि शिक्षकांना बसणार असेल, तर कुलगुरुंनी जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करावी आणि काॅलेज सुरू ठेवण्याचा निर्णय दोघांनी घ्यावा, असे निर्देश देण्यात आल्याची माहिती देखील उदय सामंत यांनी दिली आहे.

दरम्यान, मास्क घाला, शिस्त पाळा आणि लॉकडाऊन टाळा असं स्पष्टपणे सांगून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांनी राज्यात कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी ‘मी जबाबदार’ या मोहिमेची घोषणा केली. गर्दी वाढत असून  राजकीय, सामाजिक, धार्मिक अशा कार्यक्रमांना परवानगी मिळणार नाही तसंच नियम न पाळणारी मंगल कार्यालये, सभागृहे, हॉटेल्स, उपाहारगृहे यांच्यावर कडक कारवाई करण्याचे निर्देश प्रशासनाला दिल्याचंही ते म्हणाले. 

कोरोना संसर्ग रोखण्यासाठी अमरावती विभागात कडक निर्बंध घालण्यात आले आहेत त्याचा संदर्भ देऊन जिथं जिथं आवश्यकता असेल तिथल्या जिल्हा प्रशासनाने आवश्यक ते निर्बंध घालण्याचे निर्देश आपण दिले आहेत, अशी माहिती वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जनतेला दिली.

(maharashtra higher education minister uday samant reacts on colleges shut down during covid 19)

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा