Advertisement

सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री, रिक्षा-टॅक्सीच्या भाड्यात 'इतकी' वाढ!

पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती दिवसेंदिवस गगनाला भिडत आहेत. त्यात सर्व सामान्यांच्या खिशाला आणखी कात्री लागणार आहे.

सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री, रिक्षा-टॅक्सीच्या भाड्यात 'इतकी' वाढ!
(File Image)
SHARES

पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती दिवसेंदिवस गगनाला भिडत आहेत. त्यात सर्व सामान्यांच्या खिशाला आणखी कात्री लागणार आहे. कारण रिक्षा आणि टॅक्सीच्या मूळ भाड्यांमध्ये मुंबई महानगर प्रदेशात (MMR) ३ रुपयांची वाढ करण्यात आली आहे.

सुरुवातीला शहरातील टॅक्सीसाठी भाडे २२ रुपये होते. आता ते २५ रुपये केले गेले आहे. त्याचप्रमाणे ऑटो रिक्षांचे किमान भाडे आयएनआर १८ वरून आयएनआर २१ पर्यंत गेले आहे.

तत्पूर्वी, मुंबई महानगर प्रदेश परिवहन प्राधिकरणानं (एमएमआरटीए) सोमवारी, २२ फेब्रुवारी रोजी भाडेवाढीचा आढावा घेण्यासाठी बैठक घेण्याचा निर्णय घेतला.

वाहन चालकांनी सांगितलं की, इंधन, देखभाल, विमा या खर्चात वाढ होऊनही एक पैशांची दरवाढ न झाल्यानं गेल्या पाच वर्षांपासून त्यांना त्रास होत आहे. २०२० मध्ये एप्रिल ते जून या कालावधीत त्यांचे कोणतेही उत्पन्न नसल्याचे अनेक वाहनचालकांनी सांगितलं.

शहर आधीच कोविडच्या परिस्थितीशी झुंज देत आहे आणि आता भाडेवाढ केल्यानं रिक्षा आणि टॅक्सीनं प्रवास करणार्‍यांचं आर्थिक गणित कोलमडणार आहे. महानगरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढीव आवर्तनावर आहे. तर काही शहरांमध्ये पेट्रोल प्रतिलिटर १००च्या वर गेले आहे.

मुंबईत आज पेट्रोलची किंमत आयएनआर ९७ आहे तर डिझेल किरकोळ विक्री ८८.०६ वर आहे. शनिवारी, २० फेब्रुवारीपर्यंत इंधनाच्या दरात सलग १२ दिवस वाढ झाली आहे.



हेही वाचा

केंद्र सरकारनं कार्यालयीन कामाच्या वेळा बदलण्याची गरज- मुख्यमंत्री

२० फेब्रुवारीनंतर ट्रेनच्या वेळेसंदर्भात घेतला जाईल अंतिम निर्णय

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा