Advertisement

केंद्र सरकारनं कार्यालयीन कामाच्या वेळा बदलण्याची गरज- मुख्यमंत्री

सकाळी १० ते संध्याकाळी ५ ही कार्यालयीन कामकाजाच्या वेळेची पारंपरिक मानसिकता बदण्याची आवश्यकता असून, वेगवेगळ्या वेळांसाठी केंद्र सरकारनं राष्ट्रीय धोरण आखावे, अशी मागणी मुख्यमंत्र्यांनी शनिवारी निती आयोगाच्या बैठकीत केली.

केंद्र सरकारनं कार्यालयीन कामाच्या वेळा बदलण्याची गरज- मुख्यमंत्री
SHARES

मुंबईसह राज्यभरात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाच्या रुग्णांच्या संख्ये प्रचंड वाढ होत आहे. कोरोना वाढत असल्यानं गर्दीवर नियंत्रण मिळवणं व नियमांचं उल्लंघन होऊ नये यासाठी राज्य सरकार व महापालिका सतत प्रयत्न करत आहे. महाराष्ट्रासह ५ राज्यांतील कोरोना रुग्णसंख्या वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील उपनगरीय रेल्वे, रस्ते वाहतुकीवर पडणारा ताण लक्षात घेऊन केंद्र सरकारनं कार्यालयीन कामाच्या वेळा बदलण्याची गरज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निदर्शनास आणली. 

सकाळी १० ते संध्याकाळी ५ ही कार्यालयीन कामकाजाच्या वेळेची पारंपरिक मानसिकता बदण्याची आवश्यकता असून, वेगवेगळ्या वेळांसाठी केंद्र सरकारनं राष्ट्रीय धोरण आखावे, अशी  मागणी मुख्यमंत्र्यांनी शनिवारी निती आयोगाच्या बैठकीत केली.

निती आयोगाची ६वी बैठक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली दूरचित्रसंवादाच्या माध्यमातून आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत मुख्यमंत्री ठाकरे सहभागी झाले होते. मुंबईत केंद्र सरकारची कार्यालये, बँका यांच्या वेळा बदलाव्यात, अशी मागणी कोरोना निर्बंध शिथिलझाल्यापासून करण्यात येत आहे.

सरकारी कार्यालयांमुळे सकाळी आणि संध्याकाळी उपनगरीय रेल्वे गाड्यांमध्ये गर्दी होते. ती टाळण्यासाठी केंद्रानं आपल्या कार्यालयांच्या वेळा बदलण्याची आवश्यकता मुख्यमंत्र्यांनी अधोरेखित केली.

मास्कची भेट

दादर येथे मुखपट्टीविना फिरणाऱ्या नागरिकांना मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी मुखपट्ट्या भेट देऊन त्यांना जबाबदारीची जाणीव करून दिली. तसेच परदेश प्रवास करून आलेल्या प्रवाशांसाठी आरक्षित ठेवलेल्या पंचतारांकित हॉटेलचीही त्यांनी नुकतीच पाहणी केली.

सरकारी कार्यालयांमुळे सकाळी आणि सायंकाळी उपनगरीय रेल्वे गाड्यांमध्ये गर्दी होते. करोनाचा वाढता फैलाव रोखण्यासाठी गर्दी टाळणे आवश्यक आहे आणि गर्दी टाळण्यासाठी कार्यालयांच्या वेळा बदलणे गरजेचे आहे. केंद्राने आपल्या कार्यालयांच्या वेळा बदलल्यास उपनगरी गाड्यांची गर्दी विभागली जाणार आहे.

५ राज्यांतील स्थिती

राज्य
रुग्णवाढ
महाराष्ट्र
६,२८१
केरळ
४,६५०
पंजाब
३८३
मध्य प्रदेश
२९७
छत्तीसगड
२५९

२४ तासांतील रुग्ण वाढ

  • राज्यात गेल्या २४ तासांत ६,२८१ नव्या रुग्णांचे निदान.
  • मुंबई शहरात ८९७ जणांना संसर्ग, तिघांचा मृत्यू.
  • ठाणे शहरात १४७. 
  • नवी मुंबईत ११६.
  • कल्याण-डोंबिवलीत १४५ रुग्णनोंद.
Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा