Advertisement

अनधिकृत बांधकामांवर पालिकेची कारवाई


अनधिकृत बांधकामांवर पालिकेची कारवाई
SHARES

वडाळा - वडाळा पूर्व आणि लिंक रोडवरील बरकत अली नाका ते गणेशनगर या रहदारीच्या मार्गावर असलेल्या अनधिकृत फेरीवाले आणि बांधकामांवर पालिकेनं कारवाई केलीय. मागील काही दिवसांपासून या रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात वाढ झाली होती. हे अपघात थांबवण्यासाठी शिवमुद्रा युवा प्रतिष्ठान संस्थेमार्फत नागरिकांची सही मोहीम राबवण्यात आली.
अपघात रोखण्यासाठीच्या उपाययोजनांचे निवेदन एफ - उत्तर कार्यालय , वडाळा वाहतूक विभाग, वडाळा पोलीस ठाणे आणि स्थानिक आमदार आर. तमिल सेल्वन यांना देण्यात आले होतेे. त्यानुसार येथील अनधिकृत फेरीवाले तसंच बांधकामांवर शुक्रवारी पालिकेच्या वतीने तोडक कारवाई करण्यात आली. तसंच या मार्गावर लवकरच गतिरोधक बसवण्यात येणार असल्याचं आमदार आर. तमील सेल्वन यांच्या वतीने सांगण्यात आले आहे.तसंच गतिरोधकाचे काम जर लवकरात - लवकर पूर्ण न झाल्यास जन आंदोलन करणार असल्याचे शिवमुद्रा युवा प्रतिष्ठानचे सचिव प्रशांत मोरे यांनी सांगितले.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा