Advertisement

माहीम-दादर चौपाटी चकाचक : मंजुरीपूर्वीच कंत्राटदार काम बहाल

मुंबईला लाभलेल्या समुद्रकिनाऱ्यांवर समुद्रातील प्लास्टिकसह अन्य तरंगता कचरा चौपाटीवर फेकला जातो. या कचऱ्यामुळे चौपाटींवर अस्वच्छता पसरुन दुर्गंधी निर्माण होत असल्यानं या चौपाटीची स्वच्छता राखण्यासाठी महापालिका कंत्राटदाराची नेमणूक करते. मुंबई येणाऱ्या पर्यटकांना स्वच्छ आणि सुंदर चौपाट्यांचं दर्शन व्हावं आणि त्याठिकाणी त्यांना आनंद लुटता यावा म्हणून ही सफाई महापालिकेकडून करण्यात येते.

माहीम-दादर चौपाटी चकाचक : मंजुरीपूर्वीच कंत्राटदार काम बहाल
SHARES

जुहू चौपाटीच्या स्वच्छतेसाठी सहा वर्षांकरता कंत्राटदाराची नेमणूक करण्यात आल्यानंतर आता दादर-माहीम चौपाटीच्या स्वच्छतेसाठीही कंत्राटदाराचं नेमणूक करण्यात येत आहे. मात्र, स्थायी समितीच्या मंजुरीआधीच या कंत्राटासाठी पात्र ठरलेल्या कंपनीला महापालिका प्रशासनाने ४ जूनपासून पुढील ६० दिवसांचं कंत्राट दिलं आहे. त्यामुळे स्थायी समितीत प्रत्येक प्रस्ताव अनुकूल प्रतिकूल मंजूर देणाऱ्या अध्यक्षांमुळे प्रशासनानेही या समितीला गृहीत धरून त्यांच्या अधिकारातच हस्तक्षेप करण्यास सुरुवात केली आहे.

चौपाटीच्या स्वच्छतेसाठी...

मुंबईला लाभलेल्या समुद्रकिनाऱ्यांवर समुद्रातील प्लास्टिकसह अन्य तरंगता कचरा चौपाटीवर फेकला जातो. या कचऱ्यामुळे चौपाटींवर अस्वच्छता पसरुन दुर्गंधी निर्माण होत असल्यानं या चौपाटीची स्वच्छता राखण्यासाठी महापालिका कंत्राटदाराची नेमणूक करते. मुंबई येणाऱ्या पर्यटकांना स्वच्छ आणि सुंदर चौपाट्यांचं दर्शन व्हावं आणि त्याठिकाणी त्यांना आनंद लुटता यावा म्हणून ही सफाई महापालिकेकडून करण्यात येते.

सफाईवर एवढा खर्च

माहीम-दादर चौपाटीच्या साफसफाईसाठी यापूर्वी नेमण्यात आलेल्या कंत्राटदाराचं कंत्राट कालावधी ४ जून २०१८ला संपुष्ठात आला आहे. त्यामुळे पुढील सहा वर्षांकरता नवीन कंत्राटदाराची नेमणूक करण्यात आली आहे. यासाठी पावसाळ्यात प्रतिदिन ६५ हजार रुपये तर पावसाळा वगळता इतर दिवसांमध्ये प्रतिदिन ३५ हजार ३१२ रुपये एवढा खर्च या सफाईवर केला जाणार आहे.

'ही' कंपनी पात्र ठरली

पुढील सहा वर्षांकरता विशाल प्रोटेक्शन फोर्स ही कंपनी निविदेत पात्र ठरली आहे. या कंपनीला ११ कोटी ६० लाखांचं कंत्राट देण्यात येत आहे. मात्र, या कंत्राटाला स्थायी समितीची मान्यता मिळण्यापूर्वी प्रशासनाने जुन्या कंपनीला एक दोन महिन्यांची मुदतवाढ देऊन काम करून घेण्याऐवजी पात्र ठरलेल्या कंत्राटदारालाच आपल्या अधिकारात दोन महिन्यांचं कंत्राट बहाल केलं आहे. घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या माध्यमातून अशाप्रकारे वारंवार घटना घडत असून कचऱ्याचं प्रस्ताव मंजूर केल्यानंतर या विभागानं स्थायी समितीला गृहीत धरण्यास सुरुवात केल्याचं दिसून येत आहे.

दादर माहीम चौपाटीची आकडेवारी

  • लांबी : ५ कि.मी
  • रुंदी : ४५ कि.मी
  • साफसफाईसाठी असलेली यंत्रे : २
  • कॉम्पॅक्टर : १
  • टॅक्टर व ट्रॉली : १
  • कामगारांची संख्या : पावसाळी प्रतिदिन ५० आणि इतर वेळी २४
  • पावसाळी येणारा दिवसाचा खर्च : ६५ हजार १३१ रुपये
  • पावसाळा वगळाता इतर दिवसांचा प्रतिदिन खर्च : ३५ हजार ३१२ रुपये
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा