महापालिकेची कंत्राटदार नोंदणी आता ऑनलाइन

 Pali Hill
महापालिकेची कंत्राटदार नोंदणी आता ऑनलाइन

मुंबई - मुंबई महानगर पालिकेच्या स्थापत्य, यांत्रिकी वा विद्युत विषयक कोणत्याही कामांच्या निविदा प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी कंत्राटदारांना पालिकेची नोंदणी बंधनकारक आहे. आता या नोंदणी प्रक्रियेत महत्त्वपूर्ण बदल करण्यात आले असून या बदलाला नुकतीच पालिका आयुक्त अजोय मेहता यांनी मंजुरी दिली आहे. त्यानुसार आता नोंदणी ऑनलाईन झाली असून नोंदणीच्या वैधतेचा कालावधी 3 वर्षांहून 5 वर्षे इतका करण्यात आला आहे. नोंदणी प्रक्रियेसाठी अर्ज केल्याचा दिवसांपासून तीन महिन्यांच्या आता नोंदणी करणे आता बंधनकारक करण्यात आले आहे.

Loading Comments