Advertisement

महापालिका शाळांच्या शिक्षकांना गौरी विसर्जनाची सुट्टी


महापालिका शाळांच्या शिक्षकांना गौरी विसर्जनाची सुट्टी
SHARES

मुंबई महापालिका शाळांसह खासगी अनुदानित व विनाअनुदानित शाळांच्या शिक्षकांना गणेशोत्सवात गौरी विसर्जनाची सुट्टी आता दिली जाणार आहे. मुंबई महापालिकेच्या शिक्षण समितीनेच हा निर्णय घेतल्यामुळे दिवाळीतील एक सुट्टी कमी करून गौरी विसर्जनाची सुट्टी या शिक्षकांना देण्यात येणार असल्याचे शिक्षण समिती अध्यक्षा शुभदा गुडेकर यांनी स्पष्ट केले आहे.

३० आॅगस्टपर्यंतच सुट्टी

गणेशोत्सवामध्ये महापालिका शाळांसह खासगी अनुदानित व विनाअनुदानित शाळांमधील शिक्षकांना सुट्टी जाहीर झाली असून त्यात गौरी विसर्जनांची  सुट्टी देण्यात आलेली नाही. सर्व शिक्षकांना ३० ऑगस्टपर्यंत सुट्टी आहे. परंतु गौरी विसर्जन हे ३१ ऑगस्टला आहे. त्यामुळे या गणेशोत्सवात अनेक विद्यार्थी आपल्या पालकांसह तसेच शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी गावी जात असतात. त्यामुळे घरी आलेल्या गणपती बाप्पाच्या मूर्तीचे विसर्जन झाल्याशिवाय गावी गेलेल्या चाकरमान्यांना मुंबईत परतणे अवघड होऊन जाते. गणेशोत्सव आणि गौरी गणपती हा सर्वांचा आवडता सण असून अशा सणामध्ये गौरी गणपती विसर्जनाची सुट्टी विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना दिली जावी, अशी मागणी मुंबई महापालिका शिक्षक सेनेच्या वतीने करण्यात आली होती.

सुट्टीला शिक्षण समितीची मान्यता

शिक्षक सेनेने दिलेले पत्र शिक्षण समितीच्या बैठकीत ठेवण्यात आले होते. हे पत्रशिक्षण समितीच्या बैठकीत मंजूर करण्यात आले असून यापुढे शिक्षकांना गौरी विसर्जनाची सुट्टी दिली जाणार असल्याचे शिक्षण समिती अध्यक्ष शुभदा गुडेकर यांनी  दिली आहे.

सुट्टीची अदलाबदल

शिक्षण विभागाचे उपायुक्त मिलिन सावंत यांना याबाबत विचारले असता, त्यांनीही याला दुजोरा दिला आहे. शाळांना एकूण ७० ते ७२ सुट्टी दिल्या जातात आणि विविध धर्मांच्या सणांनुसार या सुट्ट्या दिल्या जातात. त्यामुळे गौरी विसर्जनाची ही सुट्टी दिवाळीमध्ये दिल्या जाणाऱ्या सुट्टीपैकी एक सुट्टी कमी करून दिली जाणार आहे. त्यामुळे सुट्टीची अदलाबदली करून ही सुट्टी देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे सावंत यांनी म्हटले आहे.


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा