'ढिसाळ' पालिका

 Chembur
'ढिसाळ' पालिका

चेंबूर -  चेंबूरमधील आर.सी मार्गावर गेल्या 5 - 6 वर्षांपासून जमिनीखालून ड्रेनेज लाईन टाकण्याचे काम सुरु आहे. मात्र हे काम कंत्राटदारांकडून अत्यंत धिम्या गतीने सुरु असून या मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. काही ठिकाणी तर फुटपाथ देखील अडवून ठेवले आहेत. त्यामुळे मार्गावरुन पादचाऱ्यांना जाण्यासाठी त्रास सहन करावा लागत आहे. अर्ध्यापेक्षा जास्त रस्ता अडवून ठेवल्याने दिवसेंदिवस या मार्गावर वाहतूक कोंडी वाढत आहे. त्यामुळे पालिकेने तत्काळ हा प्रकल्प पूर्ण करावा आणि वाहतूक कोंडीपासून सुटका करावी अशी मागणी रहिवाशांनी केली आहे.

Loading Comments