Advertisement

बामनदायापाडातील मिठी नदीवरील २७० अनधिकृत बांधकामांवर कारवाई


बामनदायापाडातील मिठी नदीवरील २७० अनधिकृत बांधकामांवर कारवाई
SHARES

अंधेरी पूर्व, मरोळ बामनदायापाडा येथील मिठी नदीच्या रुंदीकरणात तसेच सुशोभिकरणात अडथळा ठरणाऱ्या तब्बल २७० बांधकामांवर शनिवारी महापालिकेच्या वतीनं कारवाई करण्यात आली. यामध्ये पात्र असलेल्या ७२ कुटुंबांचं माहूलमधील प्रकल्पबाधितांच्या वसाहतीत पुनर्वसन करण्यात अालं. उर्वरित सर्व बांधकामं अनधिकृत असल्यामुळं पात्र आणि अपात्र कुटुंबांच्या बांधकामांवर कारवाई करत नदीचं पात्र आता सुशोभिकरणासाठी मोकळं केलं आहे.


अाता बांधता येणार संरक्षक भिंत

बामदायदायापाडा येथील मिठी नदी पात्राजवळ २७० पेक्षा अधिक बांधकामं असल्यामुळे नदीच्या सुशोभिकरणाचं काम रखडलं होतं. त्यामुळे महापालिकेच्या ‘के पूर्व’ विभागाचे सहाय्यक आयुक्त देवेंद्रकुमार जैन यांच्या नेतृत्वाखाली यासर्व बांधकामांवर धडक कारवाई करण्यात आली. त्यामुळे या परिसरात मिठी नदीची संरक्षक भिंत बांधण्यास मदत होणार आहे. तसेच या कारवाईमुळं मोकळ्या झालेल्या भागात सेवा मार्गिका (Service Road) बांधणं शक्य होणार आहे. मोकळ्या जागेत अाता ‘मलजल प्रक्रिया केंद्र’ उभारणं, परिसराचं सौंदर्यीकरण करण्यासह नागरी सेवा सुविधा देण्याच्या दृष्टीनं कार्यवाही करणं सुलभ होणार आहे.कारवाईसाठी ३ जेसीबी, २ पोकलेन, पोलिसांचा ताफा

‘परिमंडळ ३’ चे उपायुक्त आनंद वागराळकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेल्या धडक कारवाईत तब्बल ५५ पोलीस कर्मचाऱ्यांचा ताफा घटनास्थळी उपस्थित होता. याशिवाय महापालिकेचे सुमारे ६२ कामगार, कर्मचारी तसेच अधिकारी या कारवाईत सहभागी झाले होते. या कारवाईसाठी ३ जेसीबी, २ पोकलेन यासह इतर आवश्यक साधनसामुग्री वापरण्यात आली.  


संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा