दादरमधील अतिक्रमणांवर कारवाई

Dadar
दादरमधील अतिक्रमणांवर कारवाई
दादरमधील अतिक्रमणांवर कारवाई
See all
मुंबई  -  

मुंबई महापालिकेच्या दादर- जी/उत्तर विभागातर्फे दादर पश्चिमेकडील रेल्वे स्थानकालगत असलेल्या अनधिकृत फेरीवाल्यांवर गुरूवार कारवाई करण्यात आली. या कारवाईअंतर्गत रेल्वे स्थानक परिसर मोकळा करण्यात आला.

दादर- जी/उत्तर विभागाचे सहाय्यक आयुक्त रमाकांत बिरादर यांच्या मार्गदर्शनाखाली अतिक्रमण निर्मूलन खाते व शिवाजी पार्क पोलीस ठाणे यांनी 16 ते 18 मे रोजी ही कारवाई केली.

या कारवाईत तयार कपडे, कटलरी सामान, चामड्याच्या वस्तू, हातगाड्या, मोबाइल कव्हर्स, भाजीपाला, फळे इ. फेरीवाल्यांचे सामान पालिकेने जप्त केले आहे. तसेच शिवाजी पार्क पोलीस ठाण्याद्वारेही फेरीवाल्यांवर आवश्यक कारवाई करण्यात आली. अशा प्रकारची कारवाई यापुढेही दादर (पश्चिम) परिसरात करण्यात येईल, अशी माहिती जी/उत्तर विभागाच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाकडून देण्यात आली आहे.

Loading Comments

संबंधित बातम्या

© 2018 MumbaiLive. All Rights Reserved.