शत्रुघ्न सिन्हा यांच्या इमारतीतील बेकायदा बांधकामावर हातोडा


  • शत्रुघ्न सिन्हा यांच्या इमारतीतील बेकायदा बांधकामावर हातोडा
  • शत्रुघ्न सिन्हा यांच्या इमारतीतील बेकायदा बांधकामावर हातोडा
SHARE

अनधिकृत बांधकामाविरोधातील कारवाईदरम्यान मुंबई महापालिकेने भाजपाचे खा. आणि माजी मंत्री शत्रुघ्न सिन्हा यांच्या जुहूतील ८ मजली इमारतीतील बेकायदा बांधकामावर हातोडा चालवला. यावेळी शत्रुघ्न सिन्हा स्वत: इमारतीत हजर होते.

जुहूतील या इमारतीचं नाव 'रामायण' असं असून हा बंगला कम आठ मजली इमारत आहे. या बंगल्यात शत्रुघ्न सिन्हा, अभिनेत्री सोनाली सिन्हा आणि संपूर्ण कुटुंबासोबत राहतात. सिन्हा यांनी आपल्या बंगल्यातील छतावर एक टाॅयलेट, एक आॅफिस आणि एक पूजा घर अनधिकृतरित्या बांधलं होतं. पूजा घर वगळता इतर बांधकाम महापालिका कर्मचाऱ्यांनी पाडून टाकलं. तर पूजा घर इतर ठिकाणी हलवण्याची सिन्हा यांना सूचना देण्यात आली.सोबतच बांधकाम नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी शत्रुघ्न सिन्हा यांच्याविरोधात तक्रारही दाखल करण्यात येणार आहे. सिन्हा यांना महापालिकेने अनधिकृत बांधकाम हटवण्यासंबंधात ६ डिसेंबरला नोटीस पाठवली होती.यासंदर्भात शत्रुघ्न सिन्हा म्हणाले, इमारतीत काम करणाऱ्या कामगारांसाठी आम्ही छतावर एक टाॅयलेट बांधलं होतं. हे टाॅयलेट अनधिकृत असल्याचं म्हणत महापालिकेनं पाडलं. त्यांच्या कारवाईला आम्ही सहकार्यच केलं. पूजा घरही लवकरच दुसरीकडे हलवण्यात येईल.

संबंधित विषय
ताज्या बातम्या