जोगेश्वरी - जोगेश्वरी ते अंधेरी पूर्व पश्चिम पुलानजिक असलेल्या झोपड्यांवर बांधकामावर कारवाई करण्यात आलीय. 30 ते 40 झोपड्या सोमवारी पालिकेकडून हटवण्यात आल्या. या झोपड्यांमुळे या परिसरात मोठ्या प्रमाणात वाहतूकीची समस्या उद्भवत होती. आता मोकळ्या जागेचे सुशोभिकरण करून उद्यान तयार करण्यात येणार असल्याची माहिती पालिका के पूर्व विभागाच्या रस्ते विभाग अभियंता सोनावणे यांनी दिली.