Advertisement

एकाच दिवशी तब्बल ९०० व्यक्तींना आपत्कालीन व्यवस्थापन प्रशिक्षण

या प्रशिक्षण कार्यशाळांमध्ये सुमारे ८५० प्रशिक्षणार्थींनी ‘ऑनलाईन’ पद्धतीने, तर ४० प्रशिक्षणार्थींनी थेट पद्धतीने सहभाग नोंदविला होता.

एकाच दिवशी तब्बल ९०० व्यक्तींना आपत्कालीन व्यवस्थापन प्रशिक्षण
SHARES

जागतिक आपत्ती जोखीम घट दिनाच्या पार्श्वभूमिवर पालिकेने जनजागृती निमित्त केलेल्या कार्यक्रमात एकाच दिवशी ९०० व्यक्तींना आपत्कालीन व्यवस्थापन प्रशिक्षण दिले आहे. दरवर्षी विविध घटनांचा आधार घेऊन हा उपक्रम राबवला जातो. यंदा ‘कोविड – १९’ या संसर्गजन्य आजाराच्या पार्श्वभूमीवर प्रथमच दूरदृश्य प्रणालीचा वापर करण्यासह कोविड विषयक आवश्यक ती सर्व खबरदारी घेत प्रशिक्षण कार्यशाळांचे आयोजन करण्यात आले होते. या प्रशिक्षण कार्यशाळांच्या सुरुवातीला अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) श्री. सुरेश काकाणी यांनी आपत्ती व्यवस्थापनाचे महत्व आणि गरज याबद्दल सर्व प्रशिक्षणार्थींना दूरदृश्य प्रणालीद्वारे मार्गदर्शन केले. उप आयुक्त (आपत्कालीन व्यवस्थापन) श्री. प्रभात रहांगदळे यांच्या मार्गदर्शनात आयोजित या प्रशिक्षण कार्यशाळांमध्ये सुमारे ८५० प्रशिक्षणार्थींनी ‘ऑनलाईन’ पद्धतीने, तर ४० प्रशिक्षणार्थींनी थेट पद्धतीने सहभाग नोंदविला होता.

हेही वाचाः- बाॅलिवूडला संपवण्याचे प्रकार सहन करणार नाही- उद्धव ठाकरे

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या परळ येथील आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण केंद्रातून दूरदृश्य प्रणालीद्वारे ३ प्रशिक्षण कार्यशाळांचे आयोजन जागतिक आपत्ती जोखीम घट दिनानिमित्त करण्यात आले होते. यापैकी पहिल्या कार्यशाळेत भारती विद्यापीठाच्या परिचारिका महाविद्यालयातील १५० विद्यार्थी व शिक्षकांनी सहभाग नोंदविला. दुस-या कार्यशाळेत महापालिका शाळांमधील ८२ शिक्षक व ३१८ विद्यार्थी, यानुसार एकूण ३९९ प्रशिक्षणार्थींनी सहभाग घेतला. तर तिस-या कार्यशाळेत ‘टेक महिंद्रा फाऊंडेशन’ या स्वयंसेवी संस्थेशी संबंधित ३०० व्यक्तिंनी सहभाग नोंदविला. त्याचबरोबर महापालिकेच्या ‘बी’ विभागात परंपारिक पद्धतीने आयोजित थेट प्रशिक्षणामध्ये ४० प्रशिक्षणार्थींनी सहभाग नोंदविला. यामध्ये स्थानिक नागरिक आणि महापालिकेच्या कर्मचा-यांचा समावेश होता. कोविड प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे काटेकोरपणे पालन करुन या थेट प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. या कोविड प्रतिबंधात्मक उपाययोजनांमध्ये प्रामुख्याने शारीरिक अंतर पाळणे, मास्क परिधान करणे यासारख्या बाबींचा समावेश होता.   

हेही वाचाः- पोलीस मारहाण प्रकरणी ठाकरे सरकारमधील मंत्र्याला ३ महिन्यांची शिक्षा

या प्रशिक्षण कार्यशाळांमध्ये आपत्ती व्यवस्थापन विषयक विविध बाबींची माहिती देण्यात आली. यात प्रामुख्याने आपत्ती म्हणजे काय, आपत्ती व्यवस्थापन व त्याची आवश्यकता, आपत्ती व्यवस्थापनात बृहन्मुंबई महानगरपालिकेची भूमिका, आपत्कालीन परिस्थितीमध्ये काय करावे व काय करु नये यासारख्या बाबींचा समावेश होता. त्याचबरोबर याच प्रशिक्षणांचा भाग म्हणून प्रात्यक्षिक विषयक सचेतपटांचे (Animation Film) प्रसारण देखील दूरदृश्य प्रणालीद्वारे प्रशिक्षणांदरम्यान करण्यात आले. या कार्यशाळांना महापालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन खात्यातील प्रशिक्षण विषयक सत्र प्रमुख श्री. राजेंद्र लोखंडे यांनी प्रामुख्याने प्रशिक्षण दिले.

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा