Advertisement

'स्वच्छता अॅप' डाऊनलोड करण्याचा सहायक आयुक्तांच्या खांद्यावर भार


'स्वच्छता अॅप' डाऊनलोड करण्याचा सहायक आयुक्तांच्या खांद्यावर भार
SHARES

स्वच्छ मुंबईच्या जनजागृतीसाठी केंद्र शासनाने बनवलेलं ‘स्वच्छता अॅप’ जास्तीत जास्त मुंबईकरांनी डाऊनलोड करावं म्हणून महापालिकेने कंबर कसली आहे. यासाठी विभागाच्या सहायक आयुक्तांच्या खांद्यांवरच मोठी जबाबदारी टाकण्यात आली असून जे सहायक आयुक्त हे अॅप आपल्या विभागात डाऊनलोड करण्यास असमर्थ ठरतील, त्या अधिकाऱ्याच्या कामगिरीची नोंद ठेवली जाणार असल्याचा इशाराही प्रशासनाने दिला आहे. त्यामुळे स्वच्छता अॅप डाऊनलोड करण्यासाठी विभागाच्या सहायक आयुक्तांसह खाते प्रमुखांचीही कसोटी लागली आहे.


कलाकारांकडून जनजागृती

या स्वच्छता अॅपची माहिती मुंबईकरांना व्हावी म्हणून अभिनेत्री श्रुती मराठे व अभिनेता गौरव घाटणेकर यांची चित्रफित तयार करण्यात आली असून त्याद्वारे जनप्रबोधन केलं जात आहे. याशिवाय लोअर फिनिक्स मॉल, मालाड इनऑरबीट मॉल, घाटकोपर सिटी मॉल, दिडोंशी ऑबेरॉय मॉल आदी ठिकाणीही महापालिकेचे अधिकारी व कर्मचारी पथनाट्याद्वारे स्वच्छतेबाबत मुंबईकरांचं प्रबोधन करत आहेत.


कसं कराल अॅप डाऊनलोड?

GOOGLE PLAY STORE / APPLE APP STORE वरुन “Swachhata-MoHUA App” डाऊनलोड करा. हे ‘स्वच्छता अॅप’ डाऊनलोड झाल्यानंतर नागरिकांना ज्या-ज्या. ठिकाणी अस्वच्छता दिसेल, तेथील फोटो काढून महापालिकेकडे या ‘स्वच्छता अॅप’द्वारे पाठविल्या‍स महापालिकेकडून त्वरित संबंधित जागेची स्वच्छता करण्यात येईल.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा