Advertisement

दादर, माहीम नवा हॉटस्पॉट, ९७ कोरोनाग्रस्त

मुंबईतील धारावी पाठोपाठ दादर, माहीम या परिसरात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत.

दादर, माहीम नवा हॉटस्पॉट, ९७ कोरोनाग्रस्त
SHARES

मुंबईतील धारावी पाठोपाठ दादर, माहीम या परिसरात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. तसंच, जी उत्तर विभाग हा चौथ्या क्रमांकाचा हॉटस्पॉट बनला आहे. जी उत्तर विभागातील रुग्णसंख्या आता ९७ वर पोहोचली आहे. मंगळवारी धारावी येथील ५५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. मरकज येथून आलेले दोघे जण कोरोनाबाधित असल्याचे उजेडात आलं होतं.

धारावीमध्ये ६० रुग्ण सापडले असून, ८ जणांचे मृत्यू झाले आहेत. तर माहीम परिसरात बुधवारी ३ नवीन रुग्णांची नोंद होऊन एकूण संख्या ९ वर पोहोचली. दादर परिसरातही २ नवीन रुग्ण सापडल्यानं इथं कोरोनाची लागण झालेले २१ रुग्ण आहेत. धारावीत बुधवारी मुकुंदनगरमधील ४७ आणि ३९ वर्षांच्या दोन महिला कोरोनाबाधित असल्याचं उघड झालं, तर २५, ३८ आणि २४ वर्षीय ३ रुग्णांचे चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.

दादर येथील शिवाजी पार्क परिसरातील २ ज्येष्ठ नागरिकांना कोरोनाची लागण झाली आहे. माहीममध्ये ५५ वर्षीय व्यक्तीला कोरोना झाला आहे. तर गेल्या आठवड्यात कोरोनामुळं मृत्युमुखी पडलेल्या माहीम येथील दुकानदाराच्या संपर्कातील ३८ वर्षांची महिला आणि ३२ वर्षांच्या पुरुषालाही कोरोनाची लागण झाली आहे.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा