Advertisement

पालिका क्षेत्रात आगळी वेगळी उद्यान स्पर्धा

बृहन्मुंबई महापालिकेच्या उद्यान खात्याद्वारे वेगवेगळ्या ३२ गटांमध्ये उद्यान स्पर्धा घेण्यात येणार असून यात २०० चौ.मी किंवा त्यापेक्षा अधिक आकाराची सोसायटी उद्यानाचा सहभागी होता होणार आहे.

पालिका क्षेत्रात आगळी वेगळी उद्यान स्पर्धा
SHARES

बृहन्मुंबई महापालिकेच्या उद्यान खात्याद्वारे वेगवेगळ्या ३२ गटांमध्ये उद्यान स्पर्धा घेण्यात येणार असून यात २०० चौ.मी किंवा त्यापेक्षा अधिक आकाराची सोसायटी उद्यानाचा सहभागी होता होणार आहे. त्याशिवाय या स्पर्धेत उभी उद्यानं, पोडियम उद्यानं, रूफ टॉप, विविध संस्थांद्वारे देखभाल करण्यात येणाऱ्या उद्यानांनाही सहभागी होता येणार आहे. विशेष म्हणजे सोसायटीमधील पालापाचोळ्यापासून सेंद्रीय खत निर्मिती करणाऱ्या सोसायट्यांसाठीही ही स्पर्धा आयोजित करण्यात आली असून विजेत्यांना सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन गौरवण्यात येणार आहे.


३२ गटांमध्ये स्पर्धा

पालिकेच्या ३२ गटांमध्ये ही स्पर्धा आयोजित करण्यात आली असून या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी विविध अटी घालण्यात आल्या आहेत. पालिकेतील क्षेत्रात ५० पेक्षा अधिक झाडं लावणाऱ्या व त्याचं संवर्धन करणाऱ्या व्यक्ती व संस्था यांच्यासाठी स्वतंत्र गट करण्यात आला आहे. या उद्यानातील झाडं किमान सहा महिन्यांपूर्वी लावण्यात आलेली असून त्यांची उंची किमान १२ फूट, घेर ६ इंचापेक्षा कमी नसावा.

या स्पर्धेत सहभाग घेण्यासाठी २१ जानेवारी पर्यंत २०१९ पर्यंत अर्ज करणं आवश्यक आहे. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी नियम, अटी, अर्जाचा नमुना व इतर आवश्यक माहिती वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान (राणीबाग) या ठिकाणी सकाळी ११ ते ४ या वेळेत भेट द्यावी. तसचं या स्पर्धेत सहभागी होण्याकरिता अर्ज sg.gardens@mcgm.gov.in मेलवर पाठवता येईल.

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा