विसर्जनासाठी पालिका सज्ज

 Pali Hill
विसर्जनासाठी पालिका सज्ज

मुंबई - शनिवारी पाच दिवसांच्या गौरी गणपतीचे विसर्जन होणार आहे. विसर्जनासाठी मुंबई महानगर पालिकेकडून सर्व तयारी करण्यात आलीय. विसर्जना दिवशी पालिकेचे 5 हजार 173 कर्मचारी आणि 2 हजार 382 अधिकारी तैनात असल्याची माहिती पालिकेकडून देण्यात आलीय.

विसर्जनासाठी पालिकेनं केलेल्या सुविधा 

  • 69 नैसर्गिक ठिकाणी तर 100 कृत्रिम तलावांवर पालिकेकडून विसर्जनाची सोय
  • नैसर्गिक ठिकाणी 43 तर कृत्रिम तलावांवर 15 असे 58 नियंत्रण कक्ष
  • विसर्जनाच्या जागी 607 जीवरक्षक तैनात 
  • विसर्जनाच्या ठिकाणी 87 मोटरबोटही कार्यरत
  • 74 ठिकाणी प्रथमोपचाराची सोय 
  • बाप्पाच्या  स्वागतासाठी 87 स्वागत कक्ष

 

Loading Comments