Advertisement

सात वर्षांपूर्वी पालिकेनं पुलाच्या डागडुजीसाठी दिले होते रेल्वेला पैसे


सात वर्षांपूर्वी पालिकेनं पुलाच्या डागडुजीसाठी दिले होते रेल्वेला पैसे
SHARES

अंधेरीत कोसळलेला ‘तो’ पूल महापालिकेच्या ताब्यात असला तरी रेल्वे हद्दीतील पुलांच्या डागडुजीची जबाबदारी रेल्वे प्रशासनाची आहे. २०११ मध्ये म्हणजेच सात वर्षांपूर्वी महापालिकेनं या पुलाच्या दुरुतीच्या अंदाजित खर्चाची रक्कम पश्चिम रेल्वेला अदा केली होती, अशी माहिती समोर येत आहे. त्यामुळे महापालिकेने दिलेल्या निधीत रेल्वेनं या पुलाची दुरुस्ती केली की नाही, याचे रेकॉर्ड मात्र महापालिकेकडे नाहीत. त्यामुळे आता महापालिकेने जुन्या फाईल्स चाळायला सुरुवात केली आहे.


जुने रेकॉर्ड तपासण्याचे काम सुरू

रेल्वेच्या हद्दीतील वाहतूक किंवा पादचारी पुलाचे बांधकाम अथवा दुरुस्ती करण्याचे अधिकार महापालिकेला नाहीत. त्यामुळे पुलाच्या बांधकाम आणि दुरुस्तीचा खर्च रेल्वेला दिल्यानंतर ते काम रेल्वे प्रशासन करते. मात्र, या पुलाच्या बाबतीत काही रक्कम महापालिकेने २०११मध्ये रेल्वेला दिली होती, अशी माहिती अधिकृत सूत्रांकडून मिळत आहे. महापालिकेच्या पूल विभागाचे प्रमुख अभियंता शितलाप्रसाद कोरी यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी आपण रेल्वेला अशाप्रकारे खर्चाची रक्कम देत असतो. काही वर्षांपूर्वी महापालिकेनं रेल्वेला याकरता रक्कम दिली होती, त्याकरिता जुने रेकोर्ड शोधले जात आहेत. त्यानंतर आपण किती रक्कम रेल्वेला दिली होती आणि त्यांनी कधी व किती काम केलं, याची माहिती मिळेल.


पालिकेचे ५००हून अधिक कर्मचारी तैनात

अंधेरीतील वाहतूक पुलावरील पादचारी पुलाचा भाग रेल्वे मार्गावर कोसळल्यावर रेल्वे, महापालिका आणि एनडीआरएफ यांच्या मदतीनं डेब्रिज आणि लोखंडी रॉड उचलण्याचं काम सुरू आहे. यासाठी मुंबई महापालिकेच्या के पूर्व आणि के पश्चिम विभागाचे सुमारे पाचशेहुन अधिक कर्मचारी आणि अधिकारी तैनात असून डेब्रिज उचलण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. लोखंडाचे बिम उचलण्यासाठी मेट्रो रेल्वेकडून हायड्रो मशीन मागवण्यात आली आहे.


मेट्रोची हायड्रो मशीन मागवली

के पश्चिम विभागाचे २००हून  कामगार, कर्मचारी आधिकारी आणि के पूर्व विभागाचे २०००हून अधिक कर्मचारी डेब्रिज उचलण्यासाठी जुंपले आहे. के पूर्व विभागाचे सहायक आयुक्त प्रशांत सपकाळे आणि के पश्चिम विभागाचे प्रशांत गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली डेब्रिज उचलण्याचे काम सुरू आहे. यासाठी ३ जेसीबी,१ हायड्रो मशीनसह गॅस कटर आदींचा वापर केला जात आहे. गॅस कटरने लोखंडी बीमचे तुकडे करून हायड्रो मशिनने उचलले जात आहेत. आता मेट्रो रेल्वेकडून ५० टन क्षमतेची हायड्रो मशीन मागवण्यात आली असून त्याद्वारे लोखंडाचे मोठे तुकडे उचलले जात असल्याची माहिती महापालिका अधिकाऱ्यांनी दिली आहे.


हेही वाचा -

अंधेरीत पादचारी पुलाचा भाग कोसळला, अंधेरी विरार रेल्वे सेवा ठप्प

पश्चिम रेल्वे म्हणतेय, विरार-चर्चगेटदरम्यानचे सर्व पूल सुरक्षित

रेल्वेच्या दुर्लक्षामुळेच पूल कोसळला- महापौर

...आणि सावंत ठरले देवदूत

पश्चिम रेल्वे पूर्ववत होण्यास मध्यरात्र उजाडणार!



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा