Advertisement

एमएमआरडीएच्या नकारानंतर महापालिकेनं तोडलं अनधिकृत बांधकाम

विलेपार्ले-अंधेरी पूर्व भागात विमानतळाला अगदी खेटून तळ अधिक दोन मजल्याचं बांधकाम सुरु होतं. महापालिकेने या बांधकामाला नोटीस बजावत २४ तास पूर्ण होताच गुरुवारी बांधकाम तोडून टाकले.

एमएमआरडीएच्या नकारानंतर महापालिकेनं तोडलं अनधिकृत बांधकाम
SHARES

विमानतळाशेजारी करण्यात आलेल्या अनधिकृत बांधकामावर गुरुवारी महापालिकेच्यावतीनं बुलडोझर चालवण्यात आला. हे बांधकाम पाडण्याची जबाबदारी एमएमआरडीएची होती. मात्र, त्यांनी हे बांधकाम तोडण्यास नकार दिल्यामुळे महापालिकेनं या बांधकामावर हातोडा चालवला. हे बांधकाम तोडताना सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे.

एमएमआरडीएची टाळाटाळ

विलेपार्ले-अंधेरी पूर्व भागात विमानतळाला अगदी खेटून तळ अधिक दोन मजल्याचं बांधकाम सुरु होतं. नियोजन प्राधिकरण असलेल्या एमएमआरडीएला महापालिकेनं त्यावर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या. परंतू, एकप्रकारे या बांधकामाला छुपी मदत करणाऱ्या एमएमआरडीएने बांधकाम पूर्ण झाल्यावर महापालिकेला हे बांधकाम तोडण्याचे अधिकारी आमच्याकडे नसून आपणच यावर कारवाई करावी, असं दोनच दिवसांपूर्वी महापालिकेला कळवलं होतं. त्यानुसार महापालिकेने या बांधकामाला नोटीस बजावत २४ तास पूर्ण होताच गुरुवारी बांधकाम तोडून टाकले. या कारवाईसाठी पोलिसांचं विशेष सहकार्य घेण्यात आलं होतं. परिमंडळांचे पोलिस उपायुक्त कुंभारे तसेच डोईफोडे आदींसह पोलिस ताफा तैनात होता.


१० हजार चौरस फूट 

परिमंडळ उपायुक्त आनंद वाघ्राळकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेल्या या कारवाईसंदर्भात  एमएमआरडीएला कल्पना देण्यात आली होती. परंतू त्यांनी हे बांधकाम तोडण्यास नकार दिल्यानंतर महापालिकेच्यावतीनं त्यांना नोटिस बजावण्यात आली. त्यानुसार गुरुवारी सकाळी पोलिसांच्या सहकार्यामुळे तब्बल १० हजार चौरस फुटाचं बांधकाम तोडण्यात आल्याची माहिती के-पश्चिम विभागाचे सहायक आयुक्त प्रशांत सपकाळे यांनी दिली आहे.


२ मजली हॉटेलचं बांधकाम

हे बांधकाम विमानतळाला लागून होतं. तळ अधिक दोन मजल्यांचं हे हॉटेलचं बांधकाम होतं. यामध्ये ४० रुम्स काढण्यात आल्या होत्या.  पोलिस अधिकाऱ्यांनी केलेल्या सहकार्यामुळेच हे बांधकाम तोडता आलं आहे. याबाबत शहर दिवाणी न्यायालयात कॅवेट दाखल करून हे बांधकाम तोडण्यात आल्याचं सपकाळे यांनी सांगितलं.



हेही वाचा - 

अकरावीच्या पहिल्या विशेष फेरीचं वेळापत्रक जाहीर

महापौरांनी घेतली समिती अध्यक्षांची झाडाझडती; अचानक भेटीने कर्मचारी गोंधळले




संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा