Advertisement

कचरा उचलण्यास कुचराई झाल्यास दंड

मुंबईतील घनकचरा व्यवस्थापन अधिक प्रभावी व्हावे, यादृष्टीने घनकच-याची वाहतूक करण्यासाठी महापालिकेने अत्याधुनिक स्वरुपाच्या 'साईड लोडिंग कॉम्पॅक्टर'च्या सेवा कंत्राटी पद्धतीने भाड्याने घेतल्या जात आहेत. 'साईड लोडिंग कॉम्पॅक्टर' मध्ये गाडीच्या डाव्या बाजूने कचरा डबा उचलण्याची सुविधा असल्याने या गाड्या वाहतुकीच्या दृष्टीने अधिक सुविधाजनक असणार आहेत.

कचरा उचलण्यास कुचराई झाल्यास दंड
SHARES

मुंबईतील कचरा उचलण्यासाठी निवड करण्यात आलेल्या कंत्राटदारांच्या प्रत्यक्ष कामाला आता लवकरच सुरुवात होणार आहे. त्यातील पहिल्या टप्प्यातील गोरेगाव-मालाड भागातील कचरा उचलण्याच्या कामाला येत्या ८ आठ दिवसांमध्ये सुरुवात होणार आहे. यासाठी भाड्याने घेण्यात आलेल्या कॉम्पॅक्टरमध्ये 'आरएफआयडी रिडर' बसवण्यात आला आहे. ज्यामुळे प्रत्येक डबा कधी उचलला गेला की नाही याची माहिती मिळणार आहे. जर डबा उचलला न गेल्यास त्यासाठी दंड आकारण्यात येणार असून प्रत्येक कॉम्पॅक्टरचं भरलेला असताना व रिकामा झाल्यावर वजन होणार आहे. याची माहिती 'रियल टाईम बेसीस'वर 'ऑनलाईन' पध्दतीनं उपलब्ध होणार आहे.


अत्याधुनिक कॉम्पॅक्टर

मुंबईतील घनकचरा व्यवस्थापन अधिक प्रभावी व्हावे, यादृष्टीने घनकच-याची वाहतूक करण्यासाठी महापालिकेने अत्याधुनिक स्वरुपाच्या 'साईड लोडिंग कॉम्पॅक्टर'च्या सेवा कंत्राटी पद्धतीने भाड्याने घेतल्या जात आहेत. 'साईड लोडिंग कॉम्पॅक्टर' मध्ये गाडीच्या डाव्या बाजूने कचरा डबा उचलण्याची सुविधा असल्याने या गाड्या वाहतुकीच्या दृष्टीने अधिक सुविधाजनक असणार आहेत. अशाप्रकारे 'साईड लोडिंग' पद्धतीचे कॉम्पॅक्टर्स हे देशात प्रथमच वापरात येत असून प्रत्येक विभागात दोन ते चार कॉम्पॅक्टर्स हे 'साईड लोडिंग' पद्धतीचे असणार आहेत, असे अतिरिक्त आयुक्त विजय सिंघल यांनी स्पष्ट केलं.


२१ ऑगस्टपासून कॉम्पॅक्टर्सचा वापर

मुंबईतील कचरा गोळा करून त्याची डम्पिंग ग्राऊंडपर्यंत विल्हेवाट लावण्यासाठी महापालिकेच्यावतीनं १४ गटांमध्ये निविदा काढण्यात आली होती. सात वर्षांसाठी दिल्या जाणाऱ्या कंत्राटात पी-उत्तर व पी-दक्षिण या विभागासाठीचा प्रस्ताव प्रथम मंजूर झाला होता. त्यानुसार येत्या २१ ऑगस्टपासून या मालाड व गोरेगावमध्ये अत्याधुनिक कॉम्पॅक्टर्सच्या वापराची सुरुवात होणार आहे. तर महापालिकेच्या उर्वरित २२ विभागात साधारणपणे पुढील ६ ते ८ महिन्यात या कॉम्पॅक्टर्सच्या सेवा टप्प्या टप्प्याने सुरू होणार असल्याची माहिती सिंघल यांनी दिली आहे.


कचरा एकमेकात मिसळणार नाही

घनकचरा व्यवस्थापन अधिक प्रभावीपणे राबवता यावं यासाठी ६४५ कॉम्पॅक्टर्सच्या सेवा निविदा आधारित कंत्राटी पद्धतीने भाड्याने घेण्यास सुरुवात करण्यात येत आहे. यामध्ये ६ टन कचरा वहन क्षमता असणा-या ३९९ मोठ्या कॉम्पॅक्टर्सचा समावेश आहे. तर अडीच टन कचरा वहन क्षमता असणा-या २४६ लहान 'कॉम्पॅक्टर्स'चाही यामध्ये समावेश आहे. या प्रत्येक 'कॉम्पॅक्टर' मध्ये सुका कचरा व ई-कचरा वाहुन नेण्याकरीता वेगळा स्वतंत्र कप्पा देण्यास आलेला आहे. ज्यामुळे वर्गीकरण केलेला कचरा एकमेकांत मिसळणार नाही याची दक्षता घेण्यात आल्याचंही त्यांनी सांगितलं.



हेही वाचा -

मोटर पंपाची खरेदी इलेक्ट्रिकल्सची संबंध नसलेल्या कंत्राटदाराकडून

इंजिनिअरींग विद्यार्थ्यांना जातप्रमाणपत्रासाठी मुदतवाढ




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा