बृहन्मुंबई महानगरपालिके (BMC)नं १ हजार ०५० कोटी इतका खर्च कोरोना काळात केला आहे. कोरोनाव्हायरसच्या रुग्णांचा आकडा सध्या नियंत्रणात आला आहे. मात्र यापूर्वी कोरोना व्हायरसचे स्रावधिक रुग्ण हे मुंबईत नोंदवली गेली आहेत.
पालिकेच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, संरक्षणात्मक उपकरणं जसे की पीपीई किट, N95 मास्क, हातमोजे, फेस शील्ड, हायड्रॉक्सीक्लोरोक्विन, थर्मामीटर, सॅनिटायझर आणि संरक्षणात्मक चष्मा अशा वैद्यकीय उपकरणांच्या खरेदीमुळे हा खर्च झाला आहे.
शिवाय, कोविड १९ केअर सेंटर आणि जंबो सुविधा, फ्रंटलाइन कर्मचार्यांची हॉटेल बिले, कराराच्या आधारे नवीन कर्मचार्यांची भरती आणि अन्न वितरण यासारख्या नवीन सुविधा उभारण्यासाठी वित्तपुरवठा खर्च केला आहे.
अहवालानुसार, यामुळे प्रशासकिय संस्थेच्या महसुलावर परिणाम झाला आहे. मागील वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत यावर्षीच्या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत महापालिकेच्या ८० टक्क्यांपेक्षा जास्त महसुलात घट झाली होती.
महानगरपालिकेच्या वित्तीय विभागानं दिलेल्या आकडेवारीनुसार, प्रशासकिय संस्थेनं गेल्या वर्षी १ एप्रिल ते ३० जून या कालावधीत,४,९४९.५५ कोटी जमा केले. परंतु त्यातील फक्त १९.५ टक्के किंवा ९६६.३० कोटी डॉलर्स या वर्षाच्या याच कालावधीत जमा झाले आहेत.
हेही वाचा