Advertisement

सर फिरोझशाह मेहता यांना मिळणार महापालिका सभागृहात स्थान

९ महापुरुषांच्या तैलचित्रांची छायाचित्रे महापालिकेकडे उपलब्ध नसल्यामुळे सभागृहात लावणं अद्यापपर्यं शक्य झालं नव्हतं. पण तैलचित्रकार चंद्रकला कदम यांनी नष्ट झालेल्या ९ चित्रांतील सर्व महापुरुषांची मूळ छायाचित्रे शोधून काढली आहेत. त्यामुळे ही तैलचित्रे तयार करण्याची संधी त्यांना देण्यात यावी अशी विनंती त्यांनी केली होती. त्यानुसार त्यांच्याकडून ही तैलचित्रे बनवून घेतली जात असल्याचं महापालिका मुख्यालयाचे कार्यकारी अभियंता संजय सावंत यांनी सांगितलं.

सर फिरोझशाह मेहता यांना मिळणार महापालिका सभागृहात स्थान
SHARES

तब्बल १८ वर्षांपूर्वी महापालिका मुख्यालयातील पहिल्या मजल्यावर लागलेल्या आगीमध्ये महापालिका सभागृह जळून खाक झालं होता. या आगीत सभागृहातील जुनी तैलचित्रही जळाली होती. सभागृहाची शान असलेली ही तैलचित्र भिंतीवर नसल्याने सभागृहाच्या सौंदयात उणीव भासत होती. हीच बाब हेरत प्रशासनाने शहराच्या विकासात महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या महापुरूषांची तैलचित्रे पुन्हा बनवण्याचं ठरवंल आहे. त्यानुसार सर फिरोझशाह मेहता, विठ्ठलभाई पटेल यांच्यासह ९ व्यक्तींच्या तैलचित्रांना पुन्हा सभागृहात स्थान मिळणार आहे.

कधी लागली आग?

एकेकाळी महापालिका सभागृह गाजवणाऱ्या आणि मुंबईच्या जडणघडणीत महत्वाचं योगदान असलेल्या महापुरुषांची स्मृती चिरंतन ठेवण्यासाठी त्यांची तैलचित्रे सभागृहात लावण्यात आली होती. पणमहापालिका मुख्यालयाला २००० मध्ये लागलेल्या आगीत महापालिका सभागृहातील अनेक मान्यवरांची मौल्यवान तैलचित्र नष्ट झाली.

सभागृहात एकूण ११ तैलचित्रे होती. त्यापैकी सभागृहाच्या नूतनीकरणानंतर जगन्नाथ शंकरशेट व मोरेश्वर वासुदेव दोंदे यांची तैलचित्र पुन्हा लावण्यात आली. तर उर्वरीत ९ महापुरुषांची तैलचित्रे जळून खाक झाल्यामुळे लावल्यात आली नव्हती. वर्षभरापूर्वीच सभागृहामध्ये प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे यांचं तैलचित्र लावण्यात आलं.

किती खर्च?

तैलचित्रकार चंद्रकला कुमार कदम यांनी या सर्व मान्यवरांची तैलचित्रे बनवून देण्याची तयारी दर्शवली आहे. याबाबत गटनेत्यांच्या सभेमध्ये मंजुरी दिल्यानंतर आता ९ मान्यवरांची तैलचित्रे काढण्याचे काम त्यांच्याकडे सोपवण्यात येणार आहे. यासाठी सुमारे ५५ लाखांचा खर्च करण्यात येणार आहे.

मूळ छायाचित्रे शोधली

९ महापुरुषांच्या तैलचित्रांची छायाचित्रे महापालिकेकडे उपलब्ध नसल्यामुळे सभागृहात लावणं अद्यापपर्यं शक्य झालं नव्हतं. पण तैलचित्रकार चंद्रकला कदम यांनी नष्ट झालेल्या ९ चित्रांतील सर्व महापुरुषांची मूळ छायाचित्रे शोधून काढली आहेत. त्यामुळे ही तैलचित्रे तयार करण्याची संधी त्यांना देण्यात यावी अशी विनंती त्यांनी केली होती. त्यानुसार त्यांच्याकडून ही तैलचित्रे बनवून घेतली जात असल्याचं महापालिका मुख्यालयाचे कार्यकारी अभियंता संजय सावंत यांनी सांगितलं.

या महापुरुषांची बनणार तैलचित्रे

विठ्ठल ना. चंदावरकर, जहांगीर बी. बोमन बेहराम, सदाशिव कानोजी पाटील, विठ्ठलभाई जबेरभाई पटेल, इब्राहिम रहिमतुल्ला, सर फिरोजशहा मेरवानजी मेहता, दिनशा रदुलजी वाच्छा, युसुफ जे. मेहेर अली व खुर्शेद फ्रामजी नरीमन आदी ९ महापुरुषांची तैलचित्रे बनवण्यात येणार आहे.

हेही वाचा-

…तर मुंबईतील आणखी उड्डाणपूलही बंद?

लोअर परळ पूल बंद, 'या' पर्यायी मार्गांचा करा वापर

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा