Advertisement

ब्रिटन, आखाती देशांतून येणाऱ्या प्रवाशांना सक्तीने क्वारंटाइन, मुंबई महापालिकेचा निर्णय

ब्रिटन आणि आखाती देशांतून येणाऱ्या प्रवाशांची विमानतळावरच कोरोना चाचणी करणार असल्याची माहिती मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी दिली.

ब्रिटन, आखाती देशांतून येणाऱ्या प्रवाशांना सक्तीने क्वारंटाइन, मुंबई महापालिकेचा निर्णय
SHARES

ब्रिटनमध्ये कोरोनाचा नवा विषाणू सापडला आहे. त्यामुळे ब्रिटनमधून भारतात येणारी हवाई वाहतूक बंद करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. तसंच परदेशातून येणाऱ्या प्रवाशांना सक्तीने क्वारंटाईन करण्याचा निर्णय मुंबई महानगरपालिकेने घेतला आहे. ब्रिटन आणि आखाती देशांतून येणाऱ्या प्रवाशांची विमानतळावरच कोरोना चाचणी करणार असल्याची माहिती मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी दिली.

मुंबईत मंगळवारी रात्रीपासून रात्रीची संचारबंदी लागू होणार आहे. या पार्श्वभूमीवर इकबाल सिंह चहल यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी युनायटेड किंग्डम आणि आखाती देशांमधून मुंबईत येणाऱ्या विमान प्रवाशांसाठीच्या नियमांची माहिती दिली. 

इकबालसिंह चहल यांनी सांगितलं की, सध्या प्रवासात असलेली पाच विमाने मंगळवारी रात्रीपर्यंत मुंबईत दाखल होणार आहेत. यापैकी दोन विमाने मंगळवारी रात्री, दोन विमाने बुधवारी सकाळी दहा वाजता तर एक विमान हे रात्री ११ वाजण्यापूर्वी मुंबईत दाखल होईल. या विमानांमध्ये १००० प्रवाशी आहेत. या सर्वांची विमानतळावर तपासणी केली जाईल. कोरोनाची लक्षणे असलेल्या प्रवाशांना थेट क्वारंटाईन सेंटरमध्ये पाठवले जाईल. तर उर्वरित प्रवाशांनाही हॉटेल्स किंवा इतर ठिकाणी १४ दिवसांसाठी क्वारंटाईन केले जाईल.

परदेशातून येणाऱ्या लोकांसोबत काम करणारे सर्व कर्मचारी हे पीपीई किट घालूनच काम करतील. पाचपेक्षा जास्त जणांनी एकत्र येऊ नये. आवश्यक सेवांवर कोणताही परिणाम होणार नाही, असेही इकबाल सिंह चहल यांनी सांगितले.



Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा