16 ते 30 नोव्हेंबरदरम्यान स्वच्छता मोहीमेचं आयोजन

 Pali Hill
16 ते 30 नोव्हेंबरदरम्यान स्वच्छता मोहीमेचं आयोजन

मुंबई - 19 नोव्हेंबर या जागतिक शौचालय दिनानिमित्त पालिकेकडून 16 ते 30 नोव्हेंबर दरम्यान स्वच्छता मोहीम राबवण्यात येणार आहे. या मोहिमे अंतर्गत सामुदायिक आणि सार्वजनिक स्वच्छता गृहांच्या ठिकाणी तसेच परिसरात श्रमदान करुन स्वच्छता करणे, स्थानिकांच्या मदतीने भिंती रंगविणे व स्वच्छतेचे संदेश देणे , सुशोभिकरण करणे, असे अनेक उपक्रम राबवण्यात येणार आहे. तसंच या मोहिमेत सहभाग घेणाऱ्यांचा सत्कार देखील करण्यात येणार आहे. तसंच या उपक्रमात विभागातील नगरसेवक उपस्थित राहणार आहे, असे पालिका कर्मचाऱ्यांकडून सांगण्यात आले.

Loading Comments