Advertisement

गृहनिर्माण सोसायट्यांसाठी महापालिकेचे कठोर निर्देश!


गृहनिर्माण सोसायट्यांसाठी महापालिकेचे कठोर निर्देश!
SHARES

राज्यासह मुंबईतही कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. बुधवारी एका दिवसात मुंबईत तब्बल १५३९ नवे कोरोना बाधित सापडल्यामुळं प्रशासनाच्या चिंतेच वाढ झाली आहे. या पार्श्वभूमीवर आता मुंबई महानगर पालिकेकडून स्थानिक पातळीवर आणि विशेषत: गृहनिर्माण सोसायट्यांसाठी कठोर निर्देश देण्यात आले आहेत. अनेक सोसायट्यांमध्ये कोरोना संदर्भातल्या नियमांचं उल्लंघन केलं जात असल्याचं निदर्शनास आल्यामुळं हे निर्देश देण्यात आल्याचं समोर आलं आहे. 

कोरोनाला पायबंद घालण्यासाठी मुंबई महानगर पालिकेनं देखील आता कंबर कसली आहे. महापालिकेच्या आकडेवारीनुसार, मुंबईत गेल्या २ महिन्यांमध्ये नव्याने सापडणाऱ्या कोरोना बाधितांमध्ये ९० टक्के नवे बाधित हे गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये सापडत आहेत. त्यामुळे कोरोनाबाधितांची वाढ रोखण्यासाठी सोसायट्यांच्या परिसरामध्ये निर्बंध लागू करण्याची आवश्यकता व्यक्त होऊ लागली. दरम्यान, अनेक सोसायट्यांमध्ये होम आयसोलेशनमध्ये असलेले कोरोनाबाधित मोकळेपणाने फिरत असल्याचं दिसून आल्यामुळे त्यांना अटकाव करणं देखील आवश्यक ठरू लागलं आहे.

कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी आता कोविडसंदर्भातल्या नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाईचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यासोबतच ज्या इमारतींमध्ये ५ पेक्षा जास्त रुग्णसंख्या आहे, अशा पूर्ण इमारती सील करण्यात येणार असून ज्या इमारतींमध्ये ५ पेक्षा कमी रुग्ण आहेत, अशा इमारतींमध्ये फक्त संबंधित मजला सील करण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा